'हिंदू महिलांनी चार मुलांना जन्माला घालवं, दोन RSS तर दोन...'

कट्टर हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Sadhvi Ritambhara
Sadhvi RitambharaDainik Gomantak

कट्टर हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी देशातील सर्व हिंदू (Hindu) महिलांना प्रत्येकी चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. यातील दोन मुलांना राष्ट्राला समर्पित केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कानपूरमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ऋतंभरा म्हणाल्या, 'तुम्ही दोन मुलांना जन्म दिला आहे. मात्र हिंदू समाजातील बांधवांना माझी विनंती आहे की, दोन मुलांना नाही तर चार मुलांना जन्म द्या. दोन मुलांना राष्ट्रासाठी अर्पण करा. असे झाल्यास भारत लवकरच 'हिंदू राष्ट्र' होईल. चार मुलांपैकी दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) समर्पित सेवक होतील.'

Sadhvi Ritambhara
'आप'च्या सक्रियतेमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसच्या वाढल्या अडचणी

साध्वी ऋतंभरा यांनी नंतर हे युक्तिवाद केले

त्याचवेळी, पीटीआय या वृत्तसंस्थेशी साधलेल्या संवादात साध्वी ऋतंभरा यांनी त्यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद केला आहे. भारताच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर सर्व मुले देशासाठी स्वत:ला झोकून देत असत. त्यांच्या आई-वडिलांनाही त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी जास्त मुले असल्याने त्यांना फारसा त्रास झाला नाही.

भारत लवकरच हिंदू राष्ट्र होईल - साध्वी ऋतंभरा

त्या पुढे म्हणाल्या, 'देशालाही अशा लोकांची गरज आहे. संघाचे किती लाख प्रचारक बाहेर पडले ते बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले तन, मन, प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला आहे…' भारत लवकरच 'हिंदू राष्ट्र' होणार असल्याचे देखील साध्वींनी म्हटले.

Sadhvi Ritambhara
भाजप आमदाराच्या वाढल्या अडचणी, महिलेला जीवे मारण्याचं प्रकरणं आलं अंगलट

देशात समान आचारसंहिता लागू झाली पाहिजे - साध्वी

ऋतंभरा यांनी देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वकिली करत देशात समान आचारसंहिता लागू झाली पाहिजे, असे म्हटले. देशात लोकसंख्येचा असमतोल असेल तर राष्ट्राचे भवितव्याबाबत अडचणी येतील. दोन मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करा, त्यांना विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ता बनवा, देशासाठी समर्पित करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com