Kerala High Court Dainik Gomantak
देश

High Court: उच्च न्यायालयात 29 वकिलांवर 'कंटेंप्ट ऑफ कोर्ट'; महिला न्यायाधीशांविरोधात गैरवर्तन...

Kerala High Court: केरळमध्ये न्यायालयीन अवमानाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल 29 वकिलांच्या विरोधात न्यायालयीन अवमानाचा खटला सुरु झाला होता.

Manish Jadhav

Kerala High Court: केरळमध्ये न्यायालयीन अवमानाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल 29 वकिलांच्या विरोधात न्यायालयीन अवमानाचा खटला सुरु झाला. एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सहकारी वकिलांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आठवडाभरापूर्वी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली खटला सुरु केला होता. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली.

दरम्यान, कोट्टायमच्या मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) यांच्या कोर्टात गेल्या गुरुवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वकील एमपी नवाब यांच्यावर आपल्या अशिलाची सुटका करण्यासाठी खोटी जामीन कागदपत्रे तयार करुन न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, 8 नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) विवेथा सेतुमोहन यांच्या आदेशानुसार, स्थानिक पोलिसांनी वकील नवाब आणि त्यांच्या अशिलाविरुद्ध कलम 465, 466, 468 आणि 471 अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवला. फसवणूक विरोधी कायदा आणि आयपीसी 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

200 हून अधिक वकिलांनी न्यायालयीन कामकाज थांबवले

दुसरीकडे, 22 नोव्हेंबर रोजी कोट्टायम बार असोसिएशनच्या वतीने या प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर वकिलांशी दंडाधिकार्‍यांनी वाईट वर्तन केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी वकिलांनी न्यायालयीन कामकाज थांबवले आणि सीजेएम विवेथा सेतुमोहन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. या निषेधावर कारवाई करण्याच्या आपल्या आदेशात सीजेएम सेतुमोहन यांनी म्हटले की, वकील सोजन पावियानिओस आणि बेनी कुरियन यांच्या नेतृत्वाखालील 200 हून अधिक वकिलांनी त्यांच्या न्यायालयातील कामकाज थांबवले. कोट्टायम बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव आंदोलनकर्त्यांमध्ये होते. काही व्हिडिओग्राफरने निषेधासह न्यायालयीन कामकाजाचे रेकॉर्डिंग केले. पोलीस सहाय्यकांनी न्यायालयात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता वकिलांनीही त्यांच्या विरोधात मोर्चा काढला.

दुसरीकडे, 24 नोव्हेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांनी बार अशा अनावश्यक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप का करत आहे, असा सवाल केला होता. काल, मी कोट्टायमची समस्या पाहिली. आम्ही कुठे जात आहोत? याला काही अर्थ नाही. अशा घटना पाहिल्यावर सामान्य नागरिक कायदेशीर संस्थाबद्दल काय विचार करतील? असेही न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले. दुसरीकडे, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. कोट्टायम सीजेएम विवेथा सेतुमोहन यांच्या विरोधातील 29 वकिलांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान खटला सुरु केला. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता खंडपीठाने वकिलांवरचे आरोप गंभीर असल्याचे सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT