पालक विभक्त होताना मुलांच्या ताब्याबाबत केवळ मुलाच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. एक आई ‘सामाजिक अर्थाने नैतिकदृष्ट्या वाईट’ असू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की आई मुलाच्या कल्याणासाठी वाईट आहे, असे मत केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले. न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने निरीक्षण केले.
“मुलाच्या ताब्याशी संबंधित बाबींमध्ये, केवळ मुलाच्या कल्याणाच्या पैलूचा प्रथम विचार केला पाहिजे. एखादा पुरुष किंवा स्त्री नातेसंबंधातील एखाद्यासाठी वाईट असू शकते, याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती त्याच्या/तिच्या मुलासाठी वाईट आहे.
एक आई सामाजिक अर्थाने नैतिकदृष्ट्या वाईट असू शकते, परंतु ती आई मुलाच्या कल्याणासाठी चांगली असू शकते. तथाकथित नैतिकता ही समाजाने त्यांच्या स्वतःच्या आचार आणि नियमांवर आधारित निर्माण केली आहे आणि ती पालक आणि मूल यांच्यातील संदर्भित नातेसंबंधात प्रतिबिंबित होऊ नये.”
मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्या आईने केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावनी सुरू होती. आईचे मत असे होते की घरगुती हिंसाचारामुळे तिला आपले वैवाहिक घर सोडावे लागले. वडिलांची बाजू अशी होती की लग्नापासून मुक्त होण्यासाठी ती तिच्या भावाच्या मित्रासोबत पळून गेली होती.
वडिलांच्या बाजूने निर्णय देताना, कौटुंबिक न्यायालयाने असा निष्कर्ष काढला होता की आई स्वताच्या आनंदासाठी दुसर्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. जर मुलाचा ताबा तिच्याकडे दिला तर याचा मुलावर वाईट परिणाम होईल.
कौटुंबिक न्यायालयाने आईच्या विरोधात नैतिक निर्णय देण्याच्या आणि म्हणूनच तिच्या मुलाचा ताबा नाकारण्याच्या दृष्टिकोनावर जोरदार टीका करताना, उच्च न्यायालयाने म्हटले,
"कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वापरलेल्या भाषामुळे आम्ही अस्वस्थ आहे. एक महिला केवळ दुसर्या पुरुषाच्या संगतीत सापडते म्हणून, ती दुसर्यासोबत आनंदासाठी गेली होती असे कौटुंबिक न्यायालयाने म्हणने अत्यंत चुकीचे आहे. या प्रकारची भाषा जिल्हा न्यायव्यवस्थेतील उच्च पदावरील अधिकाऱ्याची मानसिकता दर्शवते.
अशा अनेक परिस्थिती असू शकतात की ज्यामुळे एखाद्याला वैवाहिक घर सोडावे लागते. जर एखादी स्त्री दुसर्या व्यक्तीबरोबर आढळली तर ती आनंदासाठी गेली असे गृहित धरू शकत नाही. अशा प्रकारच्या नैतिक निर्णयामुळे मुलांच्या ताब्याबाबतच्या चौकशीचा मुळे उद्देश हरवेल.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.