Jammu And Kashmir Dainik Gomamntak
देश

Jammu And Kashmir: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानावरुन महाविद्यालयांमध्ये तणाव; अनेक ठिकाणी आंदोलने

Prophet Muhammad: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील सोशल मीडिया पोस्टरमुळे जम्मू-काश्मीरमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

Prophet Muhammad: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील सोशल मीडिया पोस्टरमुळे जम्मू-काश्मीरमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये याविरोधात निदर्शने झाली आणि आता इतर संस्थांमध्येही त्याचा परिणाम दिसून येत आहे. काश्मीरबाहेरील एका विद्यार्थ्याने प्रेषित मोहम्मद यांच्यावर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वातावरण आणखीनच चिघळले आहे. अशा स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणणे सुरक्षा दलांसमोर आव्हान असेल. विशेषतः महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणखी चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, एनआयटीमधील वातावरण बिघडू नये म्हणून सध्या सर्व शैक्षणिक उपक्रम बंद करण्यात आले आहेत. कॅम्पसमध्ये पोलिस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॅम्पसमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्ती, विद्यार्थी आणि अगदी कर्मचाऱ्यांच्या प्रवेशावर सध्या बंदी आहे. ते म्हणाले की, पैगंबर यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या विद्यार्थ्याला एका वर्षासाठी कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र त्याच्यावर आणखी कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत.

एवढेच नाही तर आता पैगंबर यांचा अपमान करण्याचा मुद्दा बनला आहे. त्याचे पडसाद इतर महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही दिसून येत आहे. याबाबत बुधवारी अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडिया पोस्टद्वारे धार्मिक तणाव आणि शत्रुत्व वाढवल्याबद्दल कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, धर्माचा अपमान केल्याच्या आरोपाखाली कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रजिस्ट्रारने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांना पत्र दिले होते.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल केला. बुधवारी श्रीनगरच्या अमरसिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही निदर्शने केली. याशिवाय, श्रीनगरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इस्लामिया कॉलेजमध्येही निदर्शने झाली. शेर-ए-काश्मीर विद्यापीठातील 7 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला असताना ही घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांवर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचा आनंद साजरा केल्याचा आरोप आहे. या लोकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT