Crime Dainik Gomantak
देश

Karnataka Crime: लिंगायत मठाच्या प्रमुखाचा मृत्यू, सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

Karnataka Crime: कर्नाटकातील आणखी एका लिंगायत मठाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Karnataka Crime: कर्नाटकातील आणखी एका लिंगायत मठाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या रुममधून दोन पानी सुसाईड नोटही मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. सुसाईड नोटमध्ये, मठ प्रमुखाने काही लोकांवर त्याचा छळ करण्याचा कट रचल्याचा आणि त्याला मठाच्या प्रमुखपदावरुन हटवल्याचा आरोप केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. महिनाभरापूर्वीही एका लिंगायत मठातील साधू खोलीत मृतावस्थेत आढळून आला होता.

दरम्यान, लिंगायत मठाचे प्रमुख बसवलिंग स्वामी हे सोमवारी कर्नाटकातील रामनगरम जिल्ह्यात त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांकडून मंगळवारी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. दोन पानांच्या चिठ्ठीत त्यांनी काही लोकांचा छळ करुन त्यांना पदावरुन दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मठ प्रमुखांच्या भक्तांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा मृत्यू झाल्याचे समजले. मठ प्रमुखांनी सोमवारी सकाळी दरवाजा उघडला नाही आणि वारंवार केलेल्या कॉललाही प्रतिसाद दिला नाही.

तसेच, गेल्या महिन्यात कर्नाटकातील (Karnataka) बेळगावी जिल्ह्यात एक शीर मृतावस्थेत आढळले होते. शीरच्या मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर (Social Mdia) एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये शीर त्यांच्या पोस्टचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: काँग्रेसच्या झेंड्यावरून पणजीत नवा वाद! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढलेले झेंडे डॉ. अंजली निंबाळकर यांनी पुन्हा लावले

Guru Nakshatra Gochar 2026: अडकलेले पैसे मिळणार, मोठी डील फायनल होणार! देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनाने बदलणार 4 राशींचे भाग्य; नोकरदारांचेही अच्छे दिन

Goa Jeweller Fraud: दागिने परत न करणाऱ्या सोनाराविरुद्ध 3 तक्रारी; 14 लाखांची फसवणूक, वास्को पोलिसात तक्रार

Supreme Court: "दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये काय करत होता?" बायकोनं जाब विचारताच नवरा थेट सुप्रीम कोर्टात; नेमकं प्रकरण काय?

'म्हज्यो दिवचलच्यो यादी' रवींद्र फोगेरींची स्मरणयात्रा

SCROLL FOR NEXT