Karnataka: मशिदींसाठी नवा आदेश जारी, दोन वर्षांसाठी सरकारने केली ही व्यवस्था

Karnataka News: कर्नाटकातील मंदिर-मशीद आणि चर्चसाठी नवा आदेश जारी करण्यात आला आहे.
Mosques
MosquesDainik Gomantak

Karnataka Latest News: कर्नाटकातील मंदिर-मशीद आणि चर्चसाठी नवा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने 10,889 मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरुन पोलिस विभागानेही मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन परवाने जारी केले आहेत.

दरम्यान, लाऊडस्पीकरच्या वापरासाठी मशिदी, मंदिरे (Temples) आणि चर्चमधून एकूण 17,850 अर्ज सादर करण्यात आले होते. यासाठी तीन हजार हिंदू मंदिरे आणि 1,400 चर्चनाही परवानगी देण्यात आली आहे. परवाना दोन वर्षांच्या कालावधीसाठी दिला जातो. शासनाने 450 रुपये शुल्कही जमा केले आहे.

Mosques
Karnataka: बहिणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी, चाकूने 70 वार करत तरुणाची हत्या

लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली

या वर्षाच्या सुरुवातीला अनेक हिंदू संघटनांनी एकजुटीने लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली, ज्याचे उल्लंघन हिंदू संघटनांनीही केले. यानंतर आता राज्य सरकारने (State Government) परवाने जारी केले आहेत. हिंदू संघटनांनी पहाटे 5 वाजल्यापासून हिंदू देवतांच्या मंत्रजपाचे आवाहन केले होते.

हिंदू संघटना काय म्हणाल्या?

पहाटे 5 वाजता लाऊडस्पीकर लावून ते लोक (मुस्लिम) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे आम्हीही आदेशाचे उल्लंघन करु, असे हिंदू संघटनांनी म्हटले होते. तर दुसरीकडे, मुस्लिम संघटनांनी राज्यभरातील मशिदींच्या व्यवस्थापनांना नियमांचे उल्लंघन करु नये आणि लाऊडस्पीकर वाजवण्याचे परवाने मिळवताना राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करावे असे आवाहन केले होते.

Mosques
Karnataka Hijab Ban: शीख धर्माच्या तुलनेवर SC ने केला 'फाइव्ह के'चा उल्लेख

नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

मशिदी, मंदिरे आणि चर्चमध्ये लाऊडस्पीकरचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लाऊड​​स्पीकरला परवानगी असेल. लाऊडस्पीकर डेसिबलच्या मर्यादेनुसार वाजवावा लागतो. विशेष म्हणजे, डेसिबल नियंत्रित करणाऱ्या उपकरणांचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com