Congress Manifesto for Karnataka Assembly Elections 2023 Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Elections 2023: 200 युनिट मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास; कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

Congress Manifesto: काँग्रेसने बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना 1,500 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले आहे.

Manish Jadhav

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सरकार 200 युनिट मोफत वीज पुरवेल असे आश्वासन दिले आहे.

कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये दिले जातील. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

दरम्यान, काँग्रेसने (Congress) बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना 1,500 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले आहे.

सर्व महिलांना KSRTC/BMTC बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात दिले आहे.

भाजपने एक दिवसापूर्वी जाहीरनामा जारी केला

10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

भाजपने (BJP) आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीदरम्यान दारिद्र्यरेषेखाली (बीपीएल) जीवन जगणाऱ्या सर्व कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर प्रदान केले असल्याचे सांगितले.

काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला

भाजपने जारी केलेल्या जाहीरनाम्याला 'खोट्या लूटमारीचा जाहीरनामा' असं म्हणत काँग्रेसने सोमवारी म्हटले की, लोक सत्ताधारी पक्षाच्या 'खोट्या' आणि 'बकवास विधानांना' कंटाळले आहेत.

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, “हा भाजपचा खोटा जाहीरनामा आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तीनदा वाढ केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी वर्षभरात दोन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते.

आता कर्नाटकातही त्यांनी दरवर्षी तीन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.'' राज्यातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भररस्त्यात टोळक्याकडून शिवीगाळ, महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला; सांकवाळ येथील घटनेप्रकरणी वेर्णा पोलिसांकडून चौघांना बेड्या

Rohit- Virat Record: 'रो-को'चा जलवा! 2025 मध्ये विराट-रोहितने गाजवलं मैदान; पाहा वर्षभराचा 'रिपोर्ट कार्ड'!

Goa Crime: सोनं, रोकड अन् महागडे गॅजेट्स... पेडण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 53 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

गोवा सरकारकडून भारतरत्न वाजपेयींना अनोखी श्रद्धांजली; नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे नामकरण केले 'अटल'

पाकिस्तान लष्करप्रमुख आसीम मुनीरनं गुपचूप उरकलं लेकीचं लग्न, पुतण्यालाचं बनवलं जावई; रावळपिंडीत पार पडला शाही सोहळा!

SCROLL FOR NEXT