Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

Mallikarjun Kharge Controversial Statement: मल्लिकार्जुन खर्गे यांचे PM मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, 'मोदी हे विषारी सापासारखे...'

Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Manish Jadhav

Mallikarjun Kharge Controversial Statement On PM Modi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींना त्यांनी 'विषारी साप' म्हटले आहे.

कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान खर्गे यांनी हे विधान केले, ज्याचा व्हिडिओ भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट केला आहे. यापूर्वी, गुजरात निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदींना 'रावण' म्हटले होते.

खर्गे यांच्या वक्तव्यावर अमित मालवीय यांनी आक्षेप घेतला

मल्लिकार्जुन खर्गे यांचा व्हिडिओ शेअर करताना भाजप नेते अमित मालवीय यांनी आक्षेप घेतला आणि लिहिले की, 'आता काँग्रेस (Congress) अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना 'विषारी साप' म्हटले आहे.

सोनिया गांधींच्या 'मर्चंट ऑफ डेथ'पासून काय सुरु झाले आणि ते कसे संपले, हे आपल्याला माहीत आहे. हतबलता दाखवते की, कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होत आहे आणि ते त्यांना माहीत आहे.'

मल्लिकार्जुन खर्गे यांनी वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले असून त्यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा उल्लेख केला नसल्याचे म्हटले आहे. मी भारतीय जनता पक्षाला (भाजप) साप म्हटले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काय विधान केले

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना, ‘तुमची विचारसरणी आणि तत्त्वांच्या जोरावर या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हीच पुरेसे आहात’, असे म्हटले होते.

तुमची विचारधारा, तुमचा सिद्धांत अतिशय चुकीचा आहे, त्यामुळे देशाचा नाश होत आहे. तुमचा हा गैरसमज नसावा, मोदी हे विषारी सापासारखे आहेत, असेही खर्गे पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT