Goa Police: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ‘स्वस्थ पोलिस, सशक्त पोलिस’ उपक्रम; गोवा पोलिसांचे पाऊल

wastha Police Sashakta Police Goa: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात पोलिस बांधव आणि कारागृह कर्मचाऱ्यांसाठी ‘स्वस्थ पोलिस – सशक्त पोलिस’ या विशेष आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
wastha Police Sashakta Police Goa
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोवा पोलिस, व्हियानार ग्रुप, आयएमए डिचोली आणि टेलिमेडिसिन सोसायटी ऑफ इंडिया - गोवा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात पोलिस बांधव आणि कारागृह कर्मचाऱ्यांसाठी ‘स्वस्थ पोलिस – सशक्त पोलिस’ या विशेष आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कारागृह महानिरीक्षक आणि पोलिस महानिरीक्षक के. आर. चौरसिया (आयपीएस) उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक सुचेता बी. देसाई उपस्थित होत्या. याप्रसंगी चौरसिया यांनी गणवेशधारी जवानांच्या आयुष्यात शारीरिक व मानसिक आरोग्य, शिस्त आणि निरोगी जीवनशैली किती महत्त्वाची आहे यावर मार्गदर्शन केले, तर अधीक्षक देसाई यांनी कर्मचाऱ्यांच्या तणाव व्यवस्थापन आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

wastha Police Sashakta Police Goa
Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर व्हियानार ग्रुपचे जोन्स सॅम्युअल यांनी कारागृह प्रशासनाच्या उपस्थितीत दोन गरजू कैद्यांना साहित्य सुपूर्द केले. तसेच कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

उद्‍घाटन सत्रानंतर पोलिस आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध आरोग्यविषयक सत्रे घेण्यात आली. यामध्ये डॉ. शेखर साळकर, टीएसआय गोवा चॅप्टरचे सचिव डॉ. देवदत्त सैल, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गौरव देसाई आणि योग तज्ज्ञ डॉ. विशाखा मोघे यांनी मार्गदर्शन केले.

wastha Police Sashakta Police Goa
Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोलवाले कारागृहाचे अधिकारी विलास परब यांनी केले. सुरुवातीला विशेष अतिथी सुचेता बी. देसाई यांनी आभार मानले, तर व्हियानार ग्रुपचे जनसंपर्क सल्लागार जोन्स सॅम्युअल यांनी आभार मानले.

डॉ. शेखर साळकर यांचे मार्गदर्शन

यावेळी आयएमए डिचोली आणि राष्ट्रीय तंबाखू मुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी तंबाखू नियंत्रण, ड्रग्ज आणि अमलीपदार्थांच्या व्यसनाधीनतेवर मार्गदर्शन केले. ‘धूम्रपान हे ड्रग्ज आणि इतर व्यसनांचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, जी मुले धूम्रपानापासून दूर राहतात, ती ड्रग्ज आणि इतर व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता खूपच कमी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com