Supreme Court Dainik Gomantak
देश

ईदगाह मैदानावर गणेशोत्सव होणार की नाही, 3 न्यायाधीशांचे खंडपीठ करणार सुनावणी

Supreme Court: कर्नाटक सरकारने 'ईदगाह मैदानावर' गणेशोत्सवाला दिलेल्या मंजुरीवरुन वादंग सुरु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: कर्नाटक सरकारने 'ईदगाह मैदानावर' गणेशोत्सवाला दिलेल्या मंजुरीवरुन वादंग सुरु झाला आहे. कर्नाटक सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 'राज्य सरकारने बंगळुरु ईदगाह मैदानावर गणेशोत्सोव साजरा करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस परवानगी दिली आहे.' सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरु होती.

दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) राज्य सरकारला बेंगळुरुच्या चामराजपेट येथील ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. यानंतर राज्य सरकारने ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला मान्यता दिली. मात्र या मंजुरीविरोधात कर्नाटक वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचल्यावर दोन्ही न्यायमूर्तींनी अंतरिम आदेशावर एकमेकांशी असहमती दर्शवली. त्यानंतर हे प्रकरण CJI कडे सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी पाठवण्यात आले. नंतर CJI UU लळित यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, एएस ओका आणि एमएम सुंदरेश यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी पाठवले. गणेश चतुर्थीच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता हे खंडपीठ आज सुनावणी करणार आहे.

तत्पूर्वी, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, 'राज्याच्या निर्णयामुळे "धार्मिक तणाव" निर्माण होईल, कारण मुस्लिम बांधव गेल्या सहा दशकांपासून तिथे त्यांचे विधी करत आहेत. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी न झाल्यास विनाकारण तणाव निर्माण होईल.'

दुसरीकडे, 25 ऑगस्ट रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने असा निर्णय दिला होता की, ही जमीन केवळ खेळाचे मैदान म्हणून आणि सरकार किंवा BBMP द्वारे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे करण्यासाठी वापरली जाऊ शकते. मुस्लिम बांधव दोन्ही ईदला नमाज अदा करु शकतो. मात्र, एका दिवसानंतर दुसऱ्या खंडपीठाने अपीलावर आदेशात फेरबदल करुन सरकारला जमिनीबाबत निर्णय घेण्याची परवानगी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT