Supreme Court आज दोन मोठ्या प्रकरणांवर सुनावणी, हिजाब वाद आणि तलाकचा एकतर्फी अधिकारावर चर्चा

15 मार्च रोजी, कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की महिलांसाठी हिजाब घालणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak

सर्वोच्च न्यायालयात आज दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. कर्नाटक हिजाब प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेशाचे पूर्ण पालन करण्याचा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवण्यात आला होता.

15 मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने महिलांसाठी हिजाब घालणे इस्लामचा अनिवार्य भाग नसल्याचा निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेही राज्य सरकारचा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश पूर्णपणे पाळण्याचा आदेश योग्य असल्याचे म्हटले होते.

Supreme Court
Congress President Election:...अखेर काँग्रेसाला मिळणार अध्यक्ष; 17 ऑक्टोबरला निवडणूक

हिजाब (Hijab) हा धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर कर्नाटकातील उडुपी येथील मनाल आणि निबा नाझ या दोन विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यासोबतच फातिमा बुशरा, फातिमा सिफत यांच्यासह अनेक विद्यार्थिनींनीही अपील दाखल केले. या याचिकांमध्ये असे म्हटले होते की, उच्च न्यायालयाचा निर्णय घटनेच्या कलम 25 अन्वये प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो.

तलाक-ए-हसन आणि मुस्लिम पुरुषांना एकतर्फी घटस्फोटाचा अधिकार देणाऱ्या इतर तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवरही सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. तलाक-ए-हसनच्या 2 पीडित महिलांनी वेगळ्या याचिकांमध्ये ही व्यवस्था समानतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तलाकच्या बाबतीत मुस्लीम मुलींनाही इतर मुलींप्रमाणेच अधिकार मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com