Jodhpur
Jodhpur ANI
देश

देवासारखा धावला शेजारी म्हणून वाचला 7 वर्षाच्या मुलीची जीव, मारण्यासाठी धावले होते दंगलखोर

दैनिक गोमन्तक

राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी जातीय तणावानंतर हिंसाचार (Jodhpur Communal violence) उसळला , त्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी परिसरात सकाळी प्रचंड गोंधळ झाला. बिघडलेले वातावरण पाहून पोलिसांनी मंगळवारी 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली असून इंटरनेट बंद केले आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी आतापर्यंत 97 जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले. (Jodhpur Communal violence)

दरमयान हिंसाचार दरम्यान, दोन समुदायांमध्ये जोरदार दगडफेक झाली ज्यामध्ये अनेक वाहने जाळण्यात आली. यादरम्यान एक 7 वर्षांची मुलगी बदमाशांच्या जाळ्यात अडकली. हिंसाचाराच्या वेळी काही तरुणांनी लाठ्या-काठ्या घेऊन घराबाहेर उभ्या असलेल्या मुलीच्या मागे धावले, त्यानंतर तरुणीवर हल्ला करण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीवर हल्ला होत असल्याचे पाहून तिच्या शेजाऱ्याने जीवावर खेळून मुलीला वाचवले आणि स्वतःवर लाठ्या घेतल्या. शेजारी किराणा दुकान चालवणाऱ्या एका व्यापाऱ्याने या हल्ल्यातून मुलीला वाचवले, त्यानंतर त्यांच्या पाठीला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली.

बाप म्हणाला देवासारखा धावला शेजारी

मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जोधपूर दंगलीच्या आगीत जळत असताना, त्यादरम्यान शहराच्या अंतर्गत भागातील लोकांना माहिती नव्हती. दुसरीकडे, भजन की चौकी परिसरात पवन सिंघवी यांचे एक घर आहे, ज्यांना घटनेची फारशी माहिती नव्हती आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी माननीया सिंघवी घराबाहेर उभी होती.

यावेळी काही तरुणांनी मुलीवर काठ्यांनी हल्ला केला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 20 मिनिटांत अनेक लोक लाठ्या-काठ्या घेऊन आमच्या रस्त्यावर आले आणि ते पाहून मुलगी घाबरली मात्र मुलीवर हल्ला होत असल्याचे पाहून शेजारी असलेल्या अजयने मध्येच येऊन तिला वाचवले.

मुलीसाठी घातला जीव धोक्यात

मुलीला वाचवणाऱ्या अजय पुरोहितने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, तो पवन सिंघवीच्या दुकानासमोर किराणा दुकान चालवतो. अजयच्या म्हणण्यानुसार, मुलगी घराबाहेर उभी असताना अचानक काही लोकांनी तिच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला, त्यानंतर मुलीचे वडील त्यांच्यासमोर आले आणि मुलगी मागे लपली. जेव्हा हल्लेखोर मुलीला मारण्यासाठी धावले तेव्हा मी त्यांना मध्येच थांबवले आणि त्यानंतर दंगलखोरांनी मला बेदम मारहाण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Flood In Kenya: मुसळधार पावसामुळे केनियात 'हाहाकार', 42 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

SCROLL FOR NEXT