Loudspeaker Issue in Uttar Pradesh: एकीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) लाऊडस्पीकरवरून गदारोळ सुरू असून मनसे कार्यकर्ते लाऊडस्पीकर खाली उतरविण्यसाठी मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर कोणत्याही कारवाईशिवाय वेगाने खाली येत आहेत. कोणताही वाद आणि कोलाहल उत्तर प्रदेशमध्ये दिसून येत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, राज्यात सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर खाली उतरविण्यात आले आहेत. (UP Loudspeaker Row)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आमच्या सरकारने हा मुद्दा चांगला हाताळला आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर काढल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. यूपी पोलिस सातत्याने लाऊडस्पीकरविरोधात शांततेत मोहीम राबवत आहेत.
रस्त्यावरील नमाजही बंद
सीएम योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका मुद्द्यावरून सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही शांततेत सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या. आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 25 कोटींच्या आसपास आहे. यानंतरही ईदसारख्या प्रसंगी रस्त्यावर कुठेही नमाज अदा केल्याचे वृत्त नाही. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करून या नव्या आदेशाचे पालन करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.