राजधानी दिल्लीत (Delhi) बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 6 मे रोजी ओखल्यात बुलडोझरद्वारे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. शाहीनबागेत 9 मे रोजी बुलडोझर धावणार आहे. (Delhi Municipal corporation to demolish illegal construction)
20 एप्रिल रोजी दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दक्षिण दिल्ली महानगरपालिका (SDMC) आणि उत्तर दिल्ली महानगरपालिका (NDMC) च्या महापौरांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी रोहिंग्या, बांगलादेशी आणि समाजकंटकांची बेकायदा बांधकामे हटवण्याची मागणी केली होती.
दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांनी एका बैठकीनंतर सांगितले की, सरकारी जमीन, रस्ते (Road) आणि फूटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी एक योजना तयार केली जात आहे. अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे हटवण्यापूर्वी लोकांना नोटीस दिली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. आता दक्षिण दिल्ली महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात दिल्लीतील अनेक भागातील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे बुलडोझरद्वारे हटवण्यात येणार आहेत. बुलडोझरच्या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त फौजफाटा मागविला आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला होता. शोभा यात्रेदरम्यान दगडफेकीनंतर दोन समाजात हाणामारी झाली. या हिंसाचारानंतर जहांगीरपुरीतील अवैध बांधकाम आणि अतिक्रमणावर बुलडोझर धावला. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.