Jawaharlal Nehru University: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (जेएनयू) शुक्रवारी आपल्या सर्व केंद्रांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले, एका दिवसापूर्वी, कॅम्पसमधील भिंतींवर ब्राह्मणविरोधी, बनियाविरोधी घोषणा लिहिल्या गेल्या. दरम्यान, भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन कुलगुरु शांतीश्री डी.पंडित यांनी केले आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी या घटनेवर जोरदार हल्ला चढवला.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, 'जेएनयू हे 'तुकडे-तुकडे' गॅंग चालवणाऱ्या राजकीय पक्षांचा अड्डा बनत आहे, आज 'तुकडे-तुकडे' गॅंग आणि 'गजबा-ए-हिंद'ची ही साखळी देश तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ते यशस्वी होणार नाहीत.'
यापूर्वी, विद्यार्थ्यांनी 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज-II' इमारतीच्या भिंतीची तोडफोड केल्याचा दावा केला होता, ज्यावर ब्राह्मण आणि बनिया समुदायांविरोधात घोषणा लिहिल्या होत्या. या घोषणांमधून ब्राह्मण आणि बनिया समुदायाच्या विद्यार्थ्यांना (Students) विद्यापीठ आणि देश सोडून जाण्यास सांगितले.
दरम्यान, जेएनयू प्रशासनाने माहिती दिली की, कॅम्पसमधील प्रचलित सुरक्षा समस्या लक्षात घेऊन सहा कलमी अॅडवायझरी जारी करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेची विटंबना रोखण्यासाठी विद्यापीठाने सर्व केंद्रांना प्रत्येक केंद्रावर योग्य ठिकाणी सूचना फलक लावण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे, पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कुलगुरु शांतीश्री डी. पंडित यांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, जेणेकरुन भविष्यात अशा घटना रोखता येतील. जेएनयूचे कुलसचिव रविकेश यांनी एक निवेदन जारी केले की, कुलगुरु पंडित यांनी शुक्रवारी SIS-1 आणि SIS-2 ला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
निवेदनानुसार, कुलगुरुंनी विद्यार्थी, कर्मचारी (Employees) आणि शिक्षकांशी संवाद साधला, भविष्यात अशा घटनांना आळा घालता यावा यासाठी त्यांना सतर्क राहण्यास सांगितले. कुलगुरुंनी जेएनयू कॅम्पसमध्ये समानता आणि समरसतेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.