Jawaharlal Nehru University: 'रक्तपात होणार...,' कॅम्पसमधील भिंतींवर ब्राह्मण विरोधी नारा

Jawaharlal Nehru University: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. कॅम्पसच्या अनेक भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.
Jawaharlal Nehru University
Jawaharlal Nehru University Dainik Gomantak
Published on
Updated on

Jawaharlal Nehru University: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. कॅम्पसच्या अनेक भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या घोषणा लिहिल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) डाव्या विद्यार्थी संघटनेवर केला आहे. या प्रकरणाचा निषेध करताना विद्यापीठ प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. लाल रंगात लिहिलेल्या या घोषणांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घोषणांमध्ये काय लिहिले आहे?

'ब्राह्मण कॅम्पस छोडो', 'रक्तपात होईल', 'ब्राह्मण भारत छोडो', 'ब्राह्मण आणि बनिया, आम्ही येत आहोत, आम्ही बदला घेऊ', 'शाखेत परत जा' अशा अनेक घोषणा कॅम्पसच्या भिंतींवर लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे, काही प्राध्यापकांच्या दालनाबाहेरही अशाच प्रकारच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

Jawaharlal Nehru University
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार ताब्यात

वृत्तानुसार, बुधवारी रात्री या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या, त्यानंतर तोडफोड करण्यात आली होती. मात्र या घोषणा लिहिणाऱ्या लोकांबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.

अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत – जेएनयू प्रशासन

जेएनयू (JNU) प्रशासनाने कॅम्पसच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीयवादी घोषणांची दखल घेत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले की, 'जेएनयू समानतेची भाषा करते आणि अशा घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत.' विद्यापीठाच्या कुलगुरु शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या प्रमुखांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Jawaharlal Nehru University
Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याच्या मित्रांचा हात? मुसेवालाच्या वडीलांचा दावा

अभाविपने कारवाईची मागणी केली

जेएनयूमधील एबीव्हीपीचे अध्यक्ष रोहित कुमार म्हणाले की, 'कॅम्पसमध्ये डाव्या संघटनेच्या गुंडांनी जे काही केले त्याचा मी निषेध करतो. समाज आणि विद्यार्थ्यांमध्ये (Students) विष कालवण्यापेक्षा शैक्षणिक संस्थांचा वापर वाद-विवादासाठी व्हायला हवा.' दुसरीकडे, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

जेएनयूमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत

जेएनयूमध्ये भूतकाळात डाव्या विंग ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन (AISA) आणि ABVP च्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण आणि चकमकीच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी, एप्रिलमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर हिंदू सेनेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बाहेर 'भगवा जेएनयू' असे भगवे झेंडे आणि काही पोस्टर्स लावले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या दिल्ली पोलिसांनी सर्व पोस्टर्स आणि झेंडे हटवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com