JNU Clash: JNU कॅम्पसमध्ये पुन्हा राडा! हाणामारीत दोन जण जखमी

Delhi JNU Students Clash: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात गुरुवारी (10 नोव्हेंबर) विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली.
Jawaharlal Nehru University
Jawaharlal Nehru University Dainik Gomantak
Published on
Updated on

Delhi JNU Students Clash: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात गुरुवारी (10 नोव्हेंबर) विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वैयक्तिक वादातून मारामारी झाली आहे. या हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, दोन विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विषयावरुन भांडण झाले, त्यानंतर त्यांचे मित्रही भांडणात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हाणामारीदरम्यान दोन विद्यार्थी जखमी झाले. ही हाणामारी दोन विद्यार्थ्यांमध्ये झाली असून यात कोणत्याही राजकीय गटाचा सहभाग नाही. हा दोघांमधील वैयक्तिक वादाचा विषय आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भांडणानंतर कॉलेजच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला बोलावले. विद्यार्थ्यांना हटवण्यात आले आहे. पोलीस (Police) घटनास्थळी आहेत. मात्र, अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

Jawaharlal Nehru University
JNU मध्ये पुन्हा गोंधळ, ABVP च्या विद्यार्थ्यांना मारहाण; अनेकजण जखमी

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ क्लिपही व्हायरल होत आहेत, ज्यात काही विद्यार्थी कॅम्पसमध्ये लाठ्या घेऊन धावताना दिसत आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Jawaharlal Nehru University
धक्कादायक! JNU कॅम्पसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

विद्यार्थी हातात काठी घेऊन चालताना दिसतात

जेएनयू (JNU) समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांच्या हातात लाठ्या दिसत आहेत. त्यांनी त्यांचे तोंडही झाकलेले आहे. गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी दोन विद्यार्थ्यांमध्ये काही कारणावरुन भांडण झाले होते. त्यानंतर त्यांनी मित्रांना फोन केला. त्यानंतर काही मुले लाठ्या-काठ्या घेऊन कॅम्पसमध्ये फिरताना दिसले. या मारामारीत दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com