9 percent DA hike for government employees Dainik Gomantak
देश

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात थेट 9 टक्क्यांची वाढ; 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय

jharkhand government da hike: देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्ता (DA) वाढीची उत्सुकता लागलेली असतानाच, काही राज्य सरकारांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना आधीच मोठी खुशखबर दिली आहे.

Sameer Amunekar

देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्ता (DA) वाढीची उत्सुकता लागलेली असतानाच, काही राज्य सरकारांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना आधीच मोठी खुशखबर दिली आहे. केंद्रीय महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वातावरणात विविध राज्यांनी पुढाकार घेत आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात घसघशीत वाढ केली आहे. यामध्ये आता झारखंड सरकारने आघाडी घेतली असून, आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल ९ टक्क्यांपर्यंतची बंपर वाढ जाहीर केली आहे.

तीन वेगवेगळ्या वेतनश्रेणींना फायदा

झारखंड कॅबिनेटने राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, ही वाढ वेगवेगळ्या वेतन आयोगानुसार करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे.

तसेच, सहाव्या वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा भत्ता २५७ टक्क्यांवरून २६२ टक्के (५ टक्के वाढ) करण्यात आला आहे. सर्वात मोठी गूड न्यूज पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे; त्यांचा महागाई भत्ता ४७४ टक्क्यांवरून थेट ४८३ टक्के करण्यात आला आहे, म्हणजेच त्यांच्या भत्त्यात ९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो आजी-माजी कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.

इतर राज्यांमध्येही कर्मचाऱ्यांवर 'भत्ता' वर्षाव

केवळ झारखंडच नाही, तर देशातील इतरही अनेक प्रमुख राज्यांनी मे महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची भेट दिली आहे:

  • अरुणाचल प्रदेश: १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या या निर्णयानुसार नियमित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावरील डीए २ टक्क्यांनी वाढवून ६० टक्के करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील ६९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांना मिळेल.

  • तमिळनाडू: तमिळनाडू सरकारने देखील आपल्या १६ लाख कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ केली असून तो ६० टक्के झाला आहे. यामुळे राज्य सरकारवर वार्षिक १,२३० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

  • बिहार: बिहार सरकारने ६ व्या वेतन आयोगाच्या कक्षेतील कर्मचाऱ्यांसाठी डीए ५ टक्क्यांनी वाढवून तो २५७ वरून २६२ टक्के केला आहे.

  • महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना खुश केले आहे. उत्तर प्रदेशात १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या वाढीनुसार ८ लाख कर्मचारी आणि ४ लाख पेन्शनधारकांचा डीए ६० टक्के झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या बँक खात्यात आता जास्त पगार जमा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT