jharkhand acb caught ranger taking bribe manoharpur west singhbhum seized 99 lakh rupees government residence 
देश

वनविभाग रेंजरच्या छाप्यात नोटांचे बंडले पाहून सगळेच थक्क!

रेंजरने लाच मागितल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती.

दैनिक गोमन्तक

गुरुवारी झारखंडच्या पश्चिम सिंहभूमच्या मनोहरपूर ब्लॉकमध्ये, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली.कारवाईत रेंजरला लाच घेताना रंगेहात पकडले. एसीबीने रेंजरच्या अधिकृत निवासस्थानाची झडती घेतली असता 99 लाखांहून अधिक रुपयांची रोकड सापडली. दोघांनाही एसीबीने अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रेंजरने लाच मागितल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती.

यानंतर पथकाने वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) विजय कुमार आणि त्यांचा संगणक ऑपरेटर मनीष पोद्दार यांना मनोहरपूर, पोडहाट, आनंदपूर आणि सोनग्रा चक्रधरपूर येथील कोयना शेतातून रंगेहात पकडले. जुना बेड जमशेदपूरला नेण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मनोहरपूर येथील गणेश प्रामाणिक यांनी एसीबीकडे केली होती.(jharkhand acb caught ranger taking bribe manoharpur west singhbhum seized 99 lakh rupees government residence)

यानंतर एसीबीचे डीएसपी एस तिर्की यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत रेंजर आणि त्याच्या संगणक ऑपरेटरला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर पथकाने रेंजरच्या शासकीय निवासस्थानी जाऊन झडती घेतली असता, तेथून ९९ लाख २ हजार ५४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एसीबीने रेंजर आणि रेंजरच्या कॉम्प्युटर ऑपरेटरला अटक करून जमशेदपूरला नेले आहे. तेथे दोघांना न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT