School Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: 'शिक्षणाच्या आयचा घो', मद्यधुंद अवस्थेत शिक्षिका पोहोचली शाळेत

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील जशपूरमध्ये सध्या शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Jashpur News: छत्तीसगडमधील जशपूरमध्ये सध्या शिक्षण विभागाचे कर्मचारी बेलगाम झाले आहेत. कर्मचार्‍यांच्या लाजिरवाण्या हरकतीमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन होत चालली आहे. पहिल्यांदा जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात दारुची पार्टी झाली, त्यानंतर विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रधान पाठक याला अटक करण्यात आली. एवढेच नाही तर शाळकरी मुलांना कामावर रुजू करुन घेतल्याचे प्रकरणही समोर आले होते. यातच आता महिला शिक्षिका दारु पिऊन शाळेत आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Teacher

दरम्यान, जशपूर ब्लॉकमधील टिकैतगंजच्या प्राथमिक शाळेत शिक्षण अधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. मात्र त्यांनी शाळेत (School) जे पाहिले ते थक्क करायला लावणारे होते. बीईओ एमझेडयू सिद्दीकी यांनी वर्गात प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसले की, महिला शिक्षिका जगपती भगत या खुर्चीवर झोपल्या आहेत. यावर बीईओने आवाज देऊन शिक्षिकेला (Teacher) उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर मुलांनी सांगितले की, मॅडम दारुच्या नशेत शाळेत पोहोचल्या आणि वर्गात बेशुद्ध पडल्या. त्यानंतर आम्ही मॅडमला उचलून खुर्चीत बसवलं.

बीईओने वैद्यकीय सूचना दिल्या

ही बाब बीईओंना समजताच त्यांनी अतिरिक्त पोलीस (Police) अधीक्षक प्रतिभा पांडे यांना बोलावून शिक्षिकेची वैद्यकीय चाचणी करुन घेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलची मागणी केली. यावर एएसपी प्रतिभा पांडे यांनी दोन महिला कॉन्स्टेबलना शाळेत पाठवले. तिथून शिक्षिकेला पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता शिक्षिका जगपती भगत यांनी दारु पिल्याचे सिध्द झाले. त्यानंतर शिक्षिका भगत यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

SCROLL FOR NEXT