छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट ईपी श्रीवास्तव आणि कॅप्टन पांडा हे हेलिकॉप्टरमध्ये होते. सरावाच्या वेळी उतरत असताना आग लागल्याने हा अपघात झाला.
दरम्यान, हे हेलिकॉप्टर राज्य सरकारचे असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9.10 च्या सुमारास रायपूर विमानतळावर राज्य सरकारचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, हॉस्पिटल प्रशासनाने दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दोघांनाही आयसीयूमधून बाहेर काढण्यात येत आहे. मृतदेहाचा पंचनामा तयार केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल. या अपघातात हेलिकॉप्टरचे (Helicopter) पूर्णपणे नुकसान झाले आहे. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनीही ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.