Abhijit Dipke 
देश

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Abhijit Dipke Reaction On Dharmendra Pradhan Resigns: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येताच, दिल्लीतील जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांनी जल्लोष केला.

Manish Jadhav

Abhijit Dipke Reaction On Dharmendra Pradhan Resigns: नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येताच, दिल्लीतील जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांनी जल्लोष केला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेने या घडामोडीला लोकशाहीचा सर्वात मोठा विजय असल्याचे घोषित केले.

मंचाहून शेकडो समर्थक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना अभिजीत म्हणाला की, 'हे सरकार राजीनामे घेत नाही असे लोक म्हणायचे, पण मी म्हणतो- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए; आम्ही हे करुन दाखवले.' सीजेपीने हा ऐतिहासिक विजय नीट घोटाळ्याच्या तणावातून आत्महत्या केलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या स्मृतीस समर्पित केला.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची पहिली आणि प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आपल्या उर्वरित दोन मागण्यांसाठी सरकारवर दबाव वाढवला. सीजेपीने स्पष्ट केले की, नीट वादामुळे आत्महत्या केलेल्या सर्व मृत विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटींची आर्थिक भरपाई देण्यात यावी आणि आंदोलनादरम्यान देशभरातील आंदोलक विद्यार्थी व विद्यार्थी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व कायदेशीर गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. अभिजीत दीपके पुढे म्हणाला की, "आम्ही कॉकरोच आहोत, इतक्या सहजासहजी मागे हटणार नाही. लोकशाहीत घाबरायचे नसते, तर बोलणे शिकायचे असते."

सीजेपीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन पोस्ट करत सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. जोपर्यंत उर्वरित दोन्ही प्रमुख मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत जंतर-मंतरवरील हा लढा आणि आंदोलन असेच सुरु राहील, असे पक्षाने स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही दिल्लीतील (Delhi) राजकीय आणि सामाजिक वातावरण अजूनही कमालीचे तापलेले दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT