PM Modi Record: पंतप्रधान मोदींचा 'लकी 10 जून'! इंदिरा गांधींनंतर आता पंडित नेहरुंनाही टाकणार मागे; काय आहे 'तो' अद्भूत रेकॉर्ड?

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june: भारताच्या राजकीय पटलावर 10 जून रोजी एक नवा आणि सुवर्ण इतिहास रचला जाणार आहे.
PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june
PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 juneDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june: भारताच्या राजकीय पटलावर 10 जून रोजी एक नवा आणि सुवर्ण इतिहास रचला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा एक मोठा विक्रम मोडीत काढून त्यांना मागे टाकणार आहेत. काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच मागे टाकला असून, आता ते नेहरुंच्या एका ऐतिहासिक विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.

येत्या 10 जून रोजी पंतप्रधान मोदी हे पंडित नेहरुंनंतर देशात पूर्ण बहुमतासह सलग दोन कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले भाजप (BJP) नेते बनतील. याचसोबत, सत्तेत असताना संवैधानिक मार्गाने सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून इतिहास रचणारे ते देशाचे पहिले गैर-काँग्रेस पंतप्रधान ठरतील. हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर नोंदवले जाणार आहेत.

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june
PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

लोकतांत्रिक पद्धतीने निवडून येऊन देशात सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले नेते ठरणार आहेत. आतापर्यंत हा पराक्रम केवळ पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावावर नोंदवला गेला होता. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून आजतागायत ते या सर्वोच्च पदावर कायम असून, केंद्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तब्बल 12 वर्षे पूर्ण केली आहेत. आगामी 10 जून रोजी पंतप्रधान मोदी हे या पदावर आपले 4,399 दिवस पूर्ण करतील; तर पंडित नेहरु हे सार्वत्रिक निवडणुकांनंतर या पदावर 4,398 दिवस राहिले होते.

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june
Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

ऐतिहासिक संदर्भांचा विचार केला तर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणुका पार पडल्यावर पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 13 मे 1952 रोजी अधिकृतपणे पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 27 मे 1964 रोजी त्यांचे निधन होईपर्यंत, म्हणजेच एकूण 4,398 दिवस त्यांनी लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून कार्यकाळ सांभाळला होता. जर 1964 मध्ये त्यांचे अकाली निधन झाले नसते, तर हा विक्रम आणखी मोठा राहिला असता.

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june
PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

दुसरीकडे, देशाच्या माजी महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा एकूण कार्यकाळ 4,077 दिवसांचा राहिला होता. त्या 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 आणि त्यानंतर पुन्हा 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 अशा दोन टप्प्यांत पंतप्रधान होत्या. त्यांचा हा विक्रम पंतप्रधान मोदींनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातच पार केला होता.

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june
PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, पंतप्रधान मोदी पंडित नेहरुंचा 1952 च्या निवडणुकीनंतरचा सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असले, तरी भारताच्या स्वातंत्र्यापासूनचा विचार केला तर परिस्थिती वेगळी आहे. पंडित जवाहरलाल नेहरु हे 15 ऑगस्ट 1947 रोजीच देशाचे पहिले पंतप्रधान बनले होते आणि अंतरिम सरकारचे नेतृत्व करत ते 1964 पर्यंत पदावर राहिले होते.

PM Modi Breaks Jawaharlal Nehru Record 10 june
PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

त्यामुळे स्वातंत्र्यदिनापासूनची एकूण वर्षे मोजल्यास सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद भूषवण्याचा मूळ विक्रम अजूनही पंडित नेहरु यांच्याच नावावर कायम राहील, परंतु लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांच्या गणनेत 10 जून हा दिवस नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com