Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपीच्या आक्रमक मागणीपुढे अखेर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
Dharmendra Pradhan Resigns
Dharmendra Pradhan
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपीच्या आक्रमक मागणीपुढे अखेर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सीजेपी गेल्या 26 दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होती आणि त्यांच्या राजीनाम्याशिवाय सरकारसोबत कोणतीही चर्चा होणार नाही असा इशारा दिला होता. मात्र स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी 'एक्स'वर एक पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली.

Dharmendra Pradhan Resigns
PM Modi Record: पंतप्रधान मोदींचा 'लकी 10 जून'! इंदिरा गांधींनंतर आता पंडित नेहरुंनाही टाकणार मागे; काय आहे 'तो' अद्भूत रेकॉर्ड?

आपल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले की, ''गेल्या चार दशकांपासून ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिले आहेत. देश घडवण्यात युवा पिढीचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते आणि त्यांच्या स्वप्नांचे रक्षण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. 3 मे रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळल्यानंतर सरकारने तातडीने दखल घेत तपास सीबीआयकडे सोपवला आणि परीक्षा रद्द करुन पुन्हा पारदर्शकपणे आयोजित केली. 21 जून रोजी 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा पार पाडल्यानंतर 16 जुलै रोजी जाहीर झालेला निकाल समाधानकारक होता.''

मात्र गेल्या काही दिवसांत जंतर-मंतरवर आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहून आपले मन अत्यंत व्यथित झाल्याचे त्यांनी म्हटले. देशातील युवाशक्तीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय किंवा राष्ट्रविरोधी शक्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नयेत, म्हणूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. कोणत्याही निष्पाप विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे हाच आपला उद्देश असल्याचे पुढे त्यांनी स्पष्ट केले. प्रभू श्री जगन्नाथाच्या आशीर्वादाने आपण पुढेही राष्ट्रसेवेत आणि ओडिशातील जनतेच्या सेवेत समर्पित राहू, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Abhijit Dipke Reaction On Dharmendra Pradhan Resign
Dharmendra Pradhan Resignation CJP Demand
CJP Protest
Dharmendra Pradhan addressing media on Cockroach Janata Party controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com