Jammu & Kashmir: Two Hizb-ul-Mujahideen terrorists in n Khrew, Awantipora Twitter @ANI
देश

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील अवंतीपोरा (Awantipora) भागातील खिर्यु पंपोर (Khrew Encounter) भागात मारले गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी(Hizb-ul-Mujahideen terrorists) आणि सुरक्षा दल (Indian Army)यांच्यात सकाळपासून चालू असलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील अवंतीपोरा (Awantipora) भागातील खिर्यु पंपोर (Khrew Encounter) भागात मारले गेले आहेत. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दल सध्या या भागात शोध मोहीम राबवत आहे (Pulwama Encounter). ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही, परंतु स्थानिक सूत्रांनुसार हे दोघेही स्थानिकच असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन सुरक्षा दलाने चकमकीच्या ठिकाणाहून मोठया प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की चकमकीदरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला आणि सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला होता. (Jammu & Kashmir: Two Hizb-ul-Mujahideen terrorists in n Khrew, Awantipora)

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दोन्ही दहशतवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी करताना सांगितले आहे की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकजण मुस्तैकचा रहिवासी आहे. यापूर्वी झालेल्या गर्ल्स हायस्कूल पाटसुना येथील शिपाई, जाविद अहमद मलिक रहिवासी लुरगाम यांच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. हे एचएमचे हल्ला पथक होते ज्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये अनेक नागरिकांना ठार केले आहे .

पोलिसांनी सांगितले की, त्यांना गुरुवारी रात्री उशिरा पंपाोरच्या खिर्यु भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली आणि लागलीच पोलिसांचे एसओजी जवान, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथक त्या परिसरात पोहोचले आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला होता. शुक्रवारी सकाळी, जेव्हा सुरक्षा दल याभागात पोहोचले,त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला .यावेळी सुरक्षा दलाने आधी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण जेव्हा ते सहमत झाले नाहीत, तेव्हा त्यांनीही प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला.

दहशतवाद्यांनी तेथून पळून जाऊ नये म्हणून सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्यांना चकमकीच्या ठिकाणी बोलावण्यात आले. एका दहशतवाद्याला ठार केल्यानंतर सुरक्षा दल वारंवार दुसऱ्या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत होते पण दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरूच होता. सकाळी पावणे दहाच्या सुमारास सुरक्षा दलांनी दुसऱ्या दहशतवाद्यालाही ठार केले. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख अद्याप उघड करण्यात आली नसून ते स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT