जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson & Johnson) सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला (CDSCO) भारतातील 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीचा अभ्यास करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. अलीकडे, जॉन्सन ॲण्ड जॉन्सनची सिंगल-डोस कोरोना लस भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट केले की भारताकडे आता 5 EUA (Emergency Use Authorization) लस आहेत. ते म्हणाले होते की ही लस कोरोना संक्रमणाविरूद्ध आपल्या देशाच्या सामूहिक लढाला आणखी चालना देईल. याआधी, जागतिक आरोग्य कंपनी जॉन्सन ॲण्ड जॉन्सनने म्हटले होते की, 'त्याने भारतात सिंगल-डोस कोरोना लसीसाठी आपत्कालीन वापरासाठी (EUA) अर्ज केला आहे'.
लस 85 टक्के संरक्षण देते
EUA सबमिशन फेज -3 क्लिनिकल ट्रायलच्या निकालांनी दावा केला आहे की कंपनीची सिंगल-शॉट लस 85 टक्के संरक्षण देते. एवढेच नाही तर असा दावा देखील केला गेला आहे की, तो मृत्यूदर कमी करण्यास, लसीकरणानंतर 28 दिवसांच्या आत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करण्यास सक्षम आहे.
जॉन्सन ॲण्ड जॉन्सन इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की आपल्या कोरोना लसीची जागतिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, एवढेच नव्हे तर ते मुलांच्या गरजा ओळखण्यास सक्षम आहे. 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर भारतात जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कोविड -19 लसीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही 17 ऑगस्ट रोजी सीडीएससीओकडे अर्ज सादर केला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.