Jammu Kashmir Terrorist Killed Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir: कठुआमध्ये भारतीय जवानांचा थरार! जैश-ए-मोहम्मदच्या 'उस्मान'चा खात्मा; पाकड्यांचा मोठा कट उधळला

Jammu Kashmir Terrorist Killed: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बिलावर परिसरात भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादाविरुद्ध राबवलेल्या एका विशेष मोहिमेत मोठे यश संपादन केले.

Manish Jadhav

Jammu Kashmir Terrorist Killed: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बिलावर परिसरात भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादाविरुद्ध राबवलेल्या एका विशेष मोहिमेत मोठे यश संपादन केले. जम्मूच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा खतरनाक पाकिस्तानी दहशतवादी उस्मान याला कंठस्नान घालण्यात आले. ही मोहीम भारतीय सुरक्षा दलांच्या अफाट धाडसाचा आणि अचूक समन्वयाचा एक उत्तम नमुना ठरली.

बिलावरच्या घनदाट जंगलात दहशतवादी लपल्याची पक्की बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अत्यंत वेगाने या परिसराला वेढा घातला. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पोलिसांच्या एका लहान पण अत्यंत शूर तुकडीने या मोहिमेचे नेतृत्व करत दहशतवाद्याला पळून जाण्याची कोणतीही संधी उरली नाही याची खात्री केली.

मारला गेलेला दहशतवादी उस्मान हा पाकिस्तानमधून आलेला आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षित सदस्य होता. तो भारतीय हद्दीत एका मोठ्या आणि विध्वंसक हल्ल्याचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी उजाडताच बिलावरच्या जनरल एरियामध्ये शोधमोहीम तीव्र करण्यात आली आणि सुरक्षा दलांनी या भागावर पूर्णपणे ताबा मिळवला.

उस्मानचा खात्मा झाल्यामुळे जैश-ए-मोहम्मदच्या एका मोठ्या कटकारस्थानाचा पर्दाफाश झाला असून, भारतीय सीमा ओलांडून येणाऱ्या घुसखोरांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. आयजीपींनी पुष्टी केली आहे की, या भागात अजूनही काही संशयित लपले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्च ऑपरेशन अधिक व्यापक करण्यात आले आहे.

कठुआसारख्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांची (Terrorist) उपस्थिती ही सुरक्षेच्या दृष्टीने मोठे आव्हान असते, परंतु भारतीय जवान आणि स्थानिक पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना वेळीच खीळ बसली आहे. स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये आणि शांतता टिकून राहावी यासाठी प्रशासनाने या भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहेत. घुसखोर आणि त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नेटवर्कवर लगाम कसण्यासाठी सुरक्षा दले आता चोहोबाजूने तपास करत आहेत. दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीरच्या संकल्पाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, भारतीय जवानांच्या या कामगिरीमुळे देशवासीयांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT