Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Terror Attack: 'ऑपरेशन सिंदूर' या दहशतवादविरोधी कारवाईला सहा महिने पूर्ण होत असतानाच एक अत्यंत धक्कादायक गुप्तचर रिपोर्ट समोर आला आहे.
Terror Attack In Jammu Kashmir
Jammu KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर' या दहशतवादविरोधी कारवाईला सहा महिने पूर्ण होत असतानाच एक अत्यंत धक्कादायक गुप्तचर रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना, विशेषत: लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM), जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे.

'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम हल्ला

दरम्यान, या कारवाईची पार्श्वभूमी 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम (Pahalgam) येथील बैसरन मैदानात झालेल्या भयानक दहशतवादी (Terrorist) हल्ल्याशी जोडलेली आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या भीषण हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सुरक्षा दलांनी 6-7 मेच्या रात्री 'ऑपरेशन सिंदूर' ही मोठी मोहीम हाती घेतली होती.

Terror Attack In Jammu Kashmir
Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

या कारवाईदरम्यान भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 मोठे तळ (Terrorist Camps) उद्ध्वस्त केले होते. यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात एकट्या जैश-ए-मोहम्मदचे 30 हून अधिक दहशतवादी होते. तसेच, एकूण जैश-ए-मोहम्मदचे 4, लष्कर-ए-तैयबाचे 3 आणि हिज्बुल मुजाहिदीनचे 2 तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले होते. याशिवाय, जैश आणि लष्करची मुख्यालयेही मातीमोल करण्यात आली.

घुसखोरीचे आणि हल्ल्याचे प्रयत्न

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने (Pakistan) नियंत्रण रेषेवर आणि जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु केला, तसेच ड्रोनद्वारे हल्ल्याचाही प्रयत्न केला. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतानेही हल्ला करत पाकिस्तानातील विमानतळांवरील रडार सुविधा, संपर्क केंद्रे आणि हवाई क्षेत्रांना लक्ष्य करुन नुकसान पोहोचवले होते. अखेरीस, दोन्ही देशांमध्ये 10 मे रोजी युद्धबंदी करारावर सहमती झाली.

Terror Attack In Jammu Kashmir
Pahalgam Terror Attack: "आमच्यावर हल्ला झाल्यास पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ, भारतावर अण्वस्त्र हल्लाही करू", पाकिस्तानच्या राजदूताची दर्पोक्ती

सध्याचा धोका

मात्र सध्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, शांतता भंग करण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा हिंसाचार पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणाही या नवीन धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com