Terrorist Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: शिक्षकच बनला दहशतवादी, पाकिस्तानी हस्तकांच्या इशाऱ्यावर...!

Terrorist: जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सरकारी शाळेतील शिक्षक दहशतवादी निघाला आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: शिक्षकाचे काम मुलांना योग्य दिशा देण्याचे असते, पण शिक्षकच चुकीच्या दिशेने वाटचाल करु लागला तर देशातील मुलांचे काय होणार? जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सरकारी शाळेतील शिक्षक दहशतवादी निघाला आहे. या संदर्भात जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (DGP) दिलबाग सिंग यांचे वक्तव्यही समोर आले आहे.

ते म्हणाले की, 'लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला (Terrorists) अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी यापूर्वी सरकारी शाळेत शिक्षक होता. वैष्णोदेवी यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये झालेल्या स्फोटातही त्याचा हात असल्याचा आरोप आहे.'

सिंग यांनी पुढे सांगितले की, 'रियासी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरिफला जम्मूच्या नरवाल येथे नुकत्याच झालेल्या दुहेरी स्फोटांच्या तपासानंतर अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक आयईडी देखील जप्त करण्यात आला आहे.'

आरोपीने स्फोटाच्या घटनेत आपला सहभाग असल्याची कबुली दिली

राज्यात अशा प्रकारचा बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलीस प्रमुखांनी सांगितले. सिंग पुढे म्हणाले की, 'आरिफ कथितपणे त्याच्या पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरुन काम करत होता आणि त्याने वैष्णोदेवी यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या स्फोटात त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.'

तसेच, फेब्रुवारी 2022 मध्ये जम्मूच्या शास्त्री नगर भागात झालेल्या आयईडी स्फोटाव्यतिरिक्त त्याने 21 जानेवारी रोजी नरवाल येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटातही आपली भूमिका कबूल केली होती, ज्यात नऊ जण जखमी झाले होते. सिंग शेवटी म्हणाले की, "सर्व आयईडी सीमेपलीकडून पाठवण्यात आले होते." या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT