IPL 2025 Dainik Gomantak
देश

IPL 2025: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 3 दिवसांनंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम, उद्यापासून रंगणार IPLचा थरार?

IPL 2025 Resume Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरणानंतर दोन्ही देशांनी आज 10 मे 2025 रोजी युद्धविराम (Ceasefire) जाहीर केला.

Sameer Amunekar

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरणानंतर दोन्ही देशांनी आज १० मे २०२५ रोजी युद्धविराम (Ceasefire) जाहीर केला. भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले होते. पण आता युद्धविराम करण्यात आल्यामुळे आयपीएलचे सामने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

युद्धविराम करण्यात आल्यामुळे, असे मानले जात आहे की बीसीसीआय लवकरच इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकृत घोषणा करू शकते. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

ईएसपीएनच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तयारी पुन्हा सुरू करण्यात आली असून, हे सर्व सामने दक्षिण भारतातील बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या ठिकाणी खेळवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता भारत-पाकिस्तान युद्धविराम करण्यात आल्यामुळे आयपीएलचे सामने कधीपासून सुरू होणार आणि कोण-कोणत्या मैदानात सामने खेळविण्यात येतील याकडे क्रिकेटप्रेमींचा लश्र लागलं आहे.

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ५७ सामने पार पडले आहेत. ५८ वा सामना ८ मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असताना भारत-पाकिस्तान तणावामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला आणि अखेरीस रद्द करण्यात आला होता.

उर्वरित १६ सामन्यांसाठी अद्याप अधिकृत वेळापत्रक नाही. आयपीएलच्याच्या यंदाच्या हंगामात १२ लीग सामने आणि ४ प्लेऑफ सामने उर्वरित आहेत. बीसीसीआयकडून अद्याप या सामन्यांचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT