IPL 2025: बंगळुरू संघाला मोठा धक्का, प्लेऑफच्या तोंडावर 'हा' स्टार फलंदाज आयपीएलमधून बाहेर

Royal Challengers Bengaluru: संघाचा स्टार फलंदाज देवदत्त पडिकल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत त्याची कामगिरी बरीच चांगली होती.
IPL 2025
IPL 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल २०२५ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. १६ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीकडून यंदा विजेतेपदाच्या आशा बाळगल्या जात आहेत. बंगळुरू संघाचे चाहतेही यंदा ट्रॉफीचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा करत आहेत. मात्र, अशा निर्णायक टप्प्यावर आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. संघाचा एक स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला असून त्यामुळे संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संघाचा स्टार फलंदाज देवदत्त पडिकल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत त्याची कामगिरी बरीच चांगली होती. १० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना देवदत्तने १५० च्या स्ट्राईक रेटने २४७ धावा केल्या.

ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता. आता त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. मेगा लिलावात मयंक अग्रवाल विकला गेला नाही, पण आता आरसीबीने मयंक अग्रवालला १ कोटी रुपयांना संघात समाविष्ट केलं आहे.

IPL 2025
Goa Crime: मडगाव येथील हॉटेलच्या खोलीत आढळला मुंबईच्या व्यक्तीचा मृतदेह, पोलिस तपास सुरू

मयंक अग्रवाल हा आयपीएलमधील अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने पंजाब किंग्जचे नेतृत्वही केले आहे. त्याने आतापर्यंत १२७ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २६६१ धावा केल्या आहेत.

त्याच्या नावावर आयपीएलमध्ये १ शतक आणि १३ अर्धशतके आहेत. आरसीबीने त्याला १ कोटी रुपये देऊन देवदत्त पडिकलची जागा घेतली आहे. तो यापूर्वीही आरसीबीकडून खेळला आहे. तो २०११ ते २०१३ दरम्यान बेंगळुरू संघाचा भाग होता.

IPL 2025
Goa Mock Drill: 30 कामगारांची सुटका, दोन विमानांचे उड्डाण रद्द; गोव्यातील 'मॉक ड्रिल'मध्ये काय घडले?

मयंक अग्रवाल२०२३ आणि २०२४ च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग होता परंतु २०१६ च्या चॅम्पियन्सनी मेगा लिलावापूर्वी त्याला सोडले.

मयंकने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२०११-२०१३, नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), दिल्ली कॅपिटल्स (२०१४-१६, नंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स), रायझिंग पुणे सुपरजायंट्स (२०१७) आणि पंजाब किंग्ज (२०१८-२२) कडून खेळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com