BCCI म्हणते, देशापेक्षा काहीही मोठे नाही... भारत-पाकमधील युद्धजन्य स्थितीमुळे IPL स्थगित

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानात घुसून पुन्हा एकदा कारवाई केली.
BCCI
BCCIDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानात घुसून पुन्हा एकदा कारवाई केली. बालाकोटनंतर भारताची दुसरी सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग 2025 चा हंगाम तात्काळ थांबण्याची घोषणा बीसीआयकडून करण्यात आली. एक आठवड्यासाठी हंगाम थांबण्यात आल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाहीतर आम्ही देशासोबत आहोत, अशी प्रतिक्रियाही बीसीआयकडून देण्यात आली.

स्थगितीचा निर्णय

बीसीसीआयने दिलेल्या निवेदनानुसार, फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या चिंता आणि भावना तसेच प्रसारक, प्रायोजक आणि चाहत्यांच्या भावना लक्षात घेता सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

BCCI
India Pakistan War: पाकिस्तानच्या ड्रोन, क्षेपणास्त्रांचा खात्मा! भारताकडून इस्लामाबाद, लाहोर, बहावलपूर येथे हल्ले

बीसीआय देशाच्या पाठिशी खंबीरपणे उभे

''या महत्त्वाच्या टप्प्यावर बीसीसीआय देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि आपल्या देशातील लोकांसोबत सोबत आहोत. बोर्ड आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करते. देशाचे हित सर्वपरी आहे. भारतीय सेना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरोधात योग्य ती कारवाई करत असून आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत," अशी प्रतिक्रिया बीसीसीआयकडून देण्यात आली.

राष्ट्रहीत सर्वपरी

''क्रिकेटला देशात मोठ्याप्रमाणात पसंद केले जाते, मात्र राष्ट्र आणि त्याचे सार्वभौमत्व, अखंडता आणि देशाच्या सुरक्षिततेपेक्षा काहीही मोठे नाही. भारताचे रक्षण करणाऱ्या आपल्या शूरवीरांच्या पाठिशी बीसीसीआय अढळपणे उभे आहे. बीसीसीआयकडून नेहमीच देशाच्या हितासाठी निर्णय घेतले गेले आहेत,” असेही निवेदनात पुढे म्हटले.

BCCI
India Pakistan War: पाकिस्तानचा शेअर बाजार बंद, काश्‍मिरात नियंत्रण कक्ष, सौदीचे मंत्री अचानक भारतात; सीमारेषेवर घडामोडींना वेग

धर्मशाळा येथील 59 वा सामना रद्द

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे धर्मशाळा येथे गुरुवारी (8 मे) 74 सामन्यांच्या हंगामातील 59 वा सामना मध्यंतरीच रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधून खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. शहरातील विमानतळ बंद असल्याने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला धर्मशाळा येथून दिल्लीला आणण्यासाठी एक विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली.

BCCI
India-Pakistan War: "पाकिस्तानने कोणतेही पाऊल उचलले तर त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल" परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना भारताचे प्रत्युत्तर

गुरुवारी पाकिस्तानने जम्मू, राजस्थान आणि पंजाबमधील शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. भारताच्या संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानच्या या नापाक हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. एवढच नाहीतर जम्मूच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. स्फोटाच्या आवाजानंतर जम्मूमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com