Yoga Day 2025 Wishes In Marathi Dainik Gomantak
देश

International Yoga Day 2025 Wishes: 'योग' रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा शुभेच्छा संदेश

International Yoga Day 2025 Wishes In Marathi: २०१५ पासून जगभर योग दिन साजरा केला जात आहे. भारताने यामध्ये पुढाकार घेऊन योगशास्त्राला जागतिक व्यासपीठावर स्थान दिले आहे.

Sameer Amunekar

Yoga Day Wishes In Marathi

दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जगभर साजरा केला जातो. या दिवशी योगाभ्यासाचे महत्त्व, त्याचे शरीरावर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच योगाच्या माध्यमातून होणारी आत्मिक उन्नती यावर विशेष भर दिला जातो. २०१५ पासून जगभर योग दिन साजरा केला जात आहे आणि भारताने यामध्ये पुढाकार घेऊन योगशास्त्राला जागतिक व्यासपीठावर स्थान दिले आहे.

योग’ हा शब्द संस्कृतमधील ‘युज’ या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘जोडणे’ असा होतो. योगाचा उद्देश म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा संतुलित संगम घडवणे. योग हा केवळ व्यायाम नसून तो एक संपूर्ण जीवनशैली आहे.

योगाच्या माध्यमातून आपण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोल साधू शकतो. पतंजली योगसूत्रांमध्ये अष्टांग योगाचे वर्णन आहे, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश खाली दिले आहेत. हे तुम्ही सोशल मीडिया पोस्ट, बॅनर, शुभेच्छा कार्ड, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा मेसेजसाठी वापरू शकता. Yoga Day Wishes In Marathi

  • शरीर आणि मन यांचा समतोल साधणारा योग… चला आजपासून सुरूवात करू या!
    योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • रोज थोडा वेळ योगासाठी राखा, आयुष्यभर आरोग्य तुमचं साथ देईल.
    आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा!

  • तन, मन आणि आत्मा यांचा एकत्र मिलाफ म्हणजे योग.
    योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • आरोग्यासाठी एक पाऊल पुढे…
    आजपासून योग करा, आजपासून आरोग्याकडे चला!

  • रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे योग.
    योग दिन साजरा करा, आरोग्य जपा!

  • जगात आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी,
    प्रथम आपल्याला स्वतःशी जोडलं पाहिजे…
    योग म्हणजेच ती जोड!

  • "योग म्हणजे आयुष्याची कला!"
    आजपासून ही कला आत्मसात करा!
    शुभेच्छा योग दिनाच्या!

  • मन शांत, हृदय प्रसन्न आणि शरीर सशक्त ठेवणारा मार्ग म्हणजे योग.
    योग दिनाच्या शुभेच्छा!

  • योग ही फक्त कसरत नाही, ती एक जीवनपद्धती आहे!
    International Yoga Day च्या अनेक शुभेच्छा!

  • दिवसभरात फक्त ३० मिनिटं योगासाठी द्या,
    बदल तुम्हाला स्वतः जाणवेल.
    योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • योग करा, निरोगी रहा!

  • श्वासावर नियंत्रण म्हणजेच जीवनावर नियंत्रण!

  • जीवनात शांतता हवी आहे का? मग योगाला आपलसं करा!

  • आजपासून आपल्यासाठी आरोग्य आणि आनंदाची नवी सुरुवात करा!

  • योग हे केवळ व्यायाम नाही, ती एक अंतःप्रेरणा आहे.

  • आपल्या आत्म्याशी संवाद साधायचा असेल तर योग करा!

  • तणावमुक्त आयुष्य हवे असल्यास, योग हाच सर्वोत्तम उपाय आहे!

  • आरोग्य हेच खरं धन आहे – आणि योग हाच त्याचा मार्ग आहे!

  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करूया!

  • योग - शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी अमृत!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT