Blue Cab taxi counter Goa
CM Pramod Sawant Dainik Gomantak

Goa Taxi: ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर होणार सुरू! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; शुक्रवार किंवा सोमवारपासून कार्यवाही

Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन देऊन शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर सुरू करण्याची ग्वाही दिली, अशी माहिती चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांनी दिली.
Published on

मोरजी: सेक्युरिटी क्लिअरन्स नसल्याने मागील दोन महिन्यापासून बंद केलेला मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर वाहतूक खात्याअंतर्गत त्याच ठिकाणी कार्यरत राहील व याची कार्यवाही शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

या टॅक्सी काउंटरशी २०० स्थानिक टॅक्सी व्यावसायिक जोडले आहेत. काउंटर बंद झाल्याने त्यांना विमानतळाच्या बाहेर एखादे प्रवासी भाडे मिळते का, यासाठी तिष्ठत राहावे लागत आहे. या टॅक्सी व्यावसायिकांनी २६ जूनपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, बुधवारी या व्यावसायिकांनी चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस यांच्या समवेत मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळी, खजिनदार सुवेक गवस, संयुक्त खजिनदार महेश देसाई, राजन नाईक, कार्यकारिणी सदस्य राजेश मयेकर, रूपेश कांबळी उपस्थित होते. व्यावसायिकांनी आपल्या सर्व समस्या मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर मांडल्या व न्याय द्यावा अशी विनवणी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन देऊन वाहतूक खात्यामार्फत शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर सुरू करण्याची ग्वाही दिली, अशी माहिती चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांनी दिली.

गावस यांनी सांगितले की, जी एम आर कंपनीने टॅक्सी काउंटर सेक्युरिटी क्लिअरन्स नसल्याने बंद केल्याने या टॅक्सी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. या व्यावसायिकांनी स्थानिक आमदार, मंत्री, खासदार आदींची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या व निवेदन सादर केले होते.

Blue Cab taxi counter Goa
Mopa Airport: Blue Cab Taxi काउंटरवर बंदी नको! 'मोपा'वरील टॅक्सी व्यावसायिकांची मागणी, मामलेदार कार्यालयात बैठक

बुधवारी या टॅक्सी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व आपल्या मागण्या सादर केल्या. मुख्यमंत्र्यांनी वाहतूक खात्यामार्फत ब्ल्यू कॅब टॅक्सी काउंटर सुरू करण्याची ग्वाही दिल्याने टॅक्सी व्यावसायिक समाधानी आहेत.

Blue Cab taxi counter Goa
Goa Beaches: किनाऱ्यांच्या Blue Flag मानांकनाकडे गोवा सरकारचे दुर्लक्ष? प्रस्ताव न पाठवल्याची माहिती उघड; कर्नाटक आघाडीवर

अतिरिक्त ८० परवाने मिळणार

ब्ल्यू कॅप टॅक्सी व्यावसायिकांना वाहतूक खात्याने २०० परवाने दिलेले आहेत. पुढील काळात अतिरिक्त ८० टॅक्सी व्यावसायिकांना परवाने दिले जाईल, असा विश्वास तुळशीदास गावस यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com