Goa Education: गोव्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारतोय! केंद्रीय अहवालाची माहिती; प्रक्षेत्र १ श्रेणीत समावेश

Goa Education Performance: प्रभावी वर्ग व्यवहारात ९० गुणांपैकी, उत्तर गोवा ६५ तर दक्षिण गोवा ६२ गुण प्राप्त झाले. सुविधा आणि विद्यार्थी हक्कांमध्ये ५१ गुणांपैकी दोन्ही जिल्ह्यांनी समान ३३ गुण मिळवले.
Goa School News, Goa Education News
Goa Education NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील जिल्हावार शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांक २०२३-२४ जारी केली आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांना प्रक्षेत्र १ श्रेणीत (५१%-६०% दरम्यान गुण) स्थान देण्यात आले आहे, प्रक्षेत्र १ श्रेणी प्राप्त झाल्याने राज्यभरातील शालेय शिक्षणाच्या दर्जांमध्ये माफक सुधारणा होत असल्याचे दिसून येते.

दक्षिण गोव्याने ६०० पैकी ३१६ गुण मिळवले, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रक्षेत्र १ मध्ये आपले स्थान कायम ठेवले (स्कोअर: ३११), तर उत्तर गोवा प्रक्षेत्र २ (स्कोअर :२०२२-२३ मध्ये ३००) वरून किंचित सुधारणा करून ३१३ गुणांसह प्रक्षेत्र १ वर पोहोचला.

Goa School News, Goa Education News
Goa Education: इयत्ता नववीच्‍या राज्यशास्त्र, इतिहास पाठ्यपुस्तकात बदल, शिक्षकांना 12 ते 14 जूनदरम्यान मार्गदर्शन

प्रभावी वर्ग व्यवहारात ९० गुणांपैकी, उत्तर गोवा ६५ तर दक्षिण गोवा ६२ गुण प्राप्त झाले. पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी हक्कांमध्ये ५१ गुणांपैकी दोन्ही जिल्ह्यांनी समान ३३ गुण मिळवले. शालेय सुरक्षा आणि बाल संरक्षणात ३५ पैकी उत्तर गोवा १९ तर दक्षिण गोवा १६ गुण मिळवले.

Goa School News, Goa Education News
Goa Education: ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांना 3 ऱ्या वर्षात प्रवेश नाही! जुना नियम मागे घेतल्याने गोंधळ; विद्यार्थी संघटनांचे कुलगुरूंना साकडे

डिजिटल लर्निंग; उत्तर गोव्याला २६ गुण

डिजिटल लर्निंगमध्ये ५० पैकी उत्तर गोवा २६ आणि दक्षिण गोवा २४ गुण मिळवले. प्रशासन प्रक्रियेत ८४ पैकी उत्तर गोवा ४६ आणि दक्षिण ४३ गुण मिळवले. गोवाची एकूण कामगिरी प्रगतीची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com