Inspirational Yoga Success Stories: जगभरात अशा लोकांची कमी नाही ज्यांचे जीवन योगाने बदलले. काहींना दीर्घायुष्य मिळाले, काहींना शारीरिक अपंगत्वापासून मुक्तता मिळाली तर काहींना स्वतःला समजून घेण्याची संधी मिळाली. योग ही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली व्यायाम पद्धती आहे, ज्यासाठी जास्त उपकरणे किंवा जास्त पैशांची आवश्यकता नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षांत योगाची लोकप्रियता आणि नियमितपणे करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (21 जून) अशा 4 रिअल लाईफ स्टोरी सांगणार आहोत, जिथे योगाने व्यक्तीच्या जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
सर्वांना हसवणारा विनोदी कलाकार रसेल ब्रँड ड्रग्ज, सेक्सच्या अॅडिक्शनमुळे चर्चेत राहिला. पण जेव्हा योग त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला तेव्हा तो स्वत:ला अशा मोहमायी जीवनापासून दूर ठेवू लागला. ब्रँडच्या मते, अॅसिड, हिरोईन, सेक्स आणि अल्कोहोल हे त्याला त्याच्या आध्यात्मिक साधनेतील अडथळा वाटू लागले. जेव्हा तो योग करु लागला तेव्हा त्याला जाणवले की त्याचे हृदय आणि आत्मा चुकीच्या गोष्टींमध्ये गुरफटले होते.
रसेल सांगतो, 'योगाभ्यासाद्वारे मला प्रामाणिकपणाचा शोध लागला. क्षणोक्षणी देवाला भेटून मला माझ्या आयुष्यात कधीही न अनुभवलेली प्रामाणिकपणाची भावना येते.' कालांतराने, रसेलने भौतिक गोष्टींमध्ये गुरफटण्याऐवजी योगावर अधिक लक्ष केंद्रित केले. आज तो नियमितपणे योगा (Yoga) करतो. तो स्वतःचे अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आणि वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी योगसाधना करतो.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मते, तिने तिचे संपूर्ण आयुष्य योगासाठी समर्पित केले आहे. कंगना सांगते, 'जेव्हा मी 18 वर्षांची होते आणि चित्रपटसृष्टीत संधीच्या शोधात भटकत होते, तेव्हा मला सूर्य नारायण सिंह नावाचा एक माणूस दिसला. तो जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर जिम्नॅस्टिक्स करत होता आणि त्याचे संपूर्ण शरीर त्याच्या हातांवर संतुलित होते. मी ते पाहून खूप प्रभावित झाले आणि त्याला विचारले की तो मला ही कला शिकवेल का? त्यावर त्याने मला ही कला शिकवण्यास नकार दिला नाही. जेव्हा त्याने मला शिकवण्यास सुरुवात केली तेव्हा मी माझे संपूर्ण आयुष्यच योगासाठी समर्पित केले. आजही तो माझा योगगुरु आहे.'
कंगना पुढे सांगते, "स्वामी विवेकानंदांबद्दल जाणून घेतल्यानंतर मला अधिक आत्मविश्वास वाटू लागला. मी माझ्या दैनंदिन दिनचर्येत योगाभ्यासाचा समावेश केला. मी राजयोग करते. त्यासाठी खूप सराव आणि ब्रह्मचर्य गरजेचे असते. यामुळे मी एक-दोन वर्षे साध्वीसारखे जगले. राजयोगाव्यतिरिक्त, मी कुंडलिनी योग आणि त्याच्या सर्व चक्रांचा देखील अभ्यास केला." कंगनाच्या मते, सुरुवातीला ती एक मिनिटही डोळे बंद करु शकत नव्हती, परंतु आता ती 40 ते 45 मिनिटे डोळे बंद करु शकते.
ब्रिटनची रहिवासी असलेली 29 वर्षीय रेबेका बॅरी हिला तिच्या वेदनादायक शस्त्रक्रियेनंतर ती कधीही तिचे आयुष्य व्यवस्थित जगू शकणार नाही असे वाटले. बॅरी तिच्या किशोरावस्थेपासूनच स्कोलियोसिसने ग्रस्त होती. तिचा वक्र पाठीचा कणा लपवण्यासाठी ती तिच्या आकारापेक्षा मोठे कपडे घालायची. इन्वेसिव्ह सर्जरी करण्याऐवजी ती समस्येचा सामना करण्यासाठी योगाकडे वळले. एका महिन्यातच तिची पाठ सरळ झाली आणि तिला अधिक आत्मविश्वास वाटू लागला. योगासोबतच, बॅरी आज तिचा आवडता खेळ, स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेते.
अमेरिकन पत्रकार, लेखक अर्नोल्ड श्वार्झनेगर यांची पत्नी मारिया श्रीव्हर सांगते, योगाने तिचे जीवन वाचवले. वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईची कर्करोगाशी झुंज आणि त्याचवेळी नवऱ्याने सोडल्यानंतर मारियाला वाटले की आता जगण्यात काही अर्थ राहिला नाही. दारुच्या व्यसनातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नादरम्यान तिने शरीर, मन आणि आत्म्याला स्वतःपासून वेगळे केले. ती एकदा एका मैत्रिणीसोबत योगा क्लासला गेली. तिच्या पहिल्या योगा क्लासमध्ये ती खूप रडली. मात्र योगासनांनी तिचे शरीर आणि मन पुन्हा एकत्र आणले. जेव्हा ती तिच्या योगा मॅटवरुन उठली तेव्हा ती वेगळीच व्यक्ती होती. मारिया सांगते, "योगाने मला पुन्हा उभे केले. जेव्हा मी जीवनातील संघर्षांमुळे तुटले होते."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.