nirmala 1.jpg 
देश

भारतीयांची स्विस बॅंकेत 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम?; मोदी सरकार म्हणाले..

गोमंन्तक वृत्तसेवा

भारतीयांनी (Indian) स्विस बॅंकेत (Swiss bank) जमा केलेली रक्कम 20 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बॅंकेने जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बॅंकांमध्ये तब्बल 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Union Ministry of Finance) हे वृत्त नाकारले आहे. स्विस बॅंकातील ठेवीमध्ये वाढ किंवा घट याची पडताळणी करण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. 

शनिवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ट्विटबाबत स्विस अधिकाऱ्यांकडून यासंबंधीची माहिती मागितली असल्याची माहिती दिली आहे. मंत्रालयाने प्रसिध्दीपत्रक जाहीर करत म्हटले आहे की, शुक्रवारी अनेक अहवाल माध्यमांमध्ये प्रसिध्द करण्यात आले होते ज्यात असे म्हटले होते की, एकीकडे खासगी बॅंकामध्ये जमा केलेली रक्कम खाली असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्युरिटीज आणि इतर मार्गांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आहे. (Indians have more than Rs 20000 crore in Swiss banks Modi government said)

एसएनबी (SNB) च्या आकडेवारीनुसार, भारतीयांची 2019 च्या अखेरीस भारतीयांच्या ठेवींची संख्या 6,625 कोटी एवढी आहे. प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टनुसार, असे समजते की, नॅशनल बॅंकेकडे नोंदवलेली अधिकृत आकडेवारी आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्यात आलेली रक्कम ही काळा पैसा असल्याचे दर्शवत नाही. शिवाय या आकडेवारीमध्ये अनिवासी भारतीय आणि इतर लोकांद्वारे तिसऱ्या देशीमधील संस्थांच्या नावावर स्विस बॅंकेत पैसे असू शकतात, असेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

ग्राहकांनी जमा केलेली रक्कम 2019 अखेरपासून कमी झाली आहे. विश्वासदर्शक संस्थामार्फत 2019 चा असणार निधी निम्म्याहून अधिक खाली आला आहे. सगळ्यात मोठी वाढ ही सिक्युरिटीज, बॉंड्स आणि इतर अनेक वित्तीय संस्थाच्या रुपामध्ये आहे, असे मंत्रालयाने सांगितले.

भारत आणि स्वित्झर्लंड यांनी आपली कर प्रणाली परस्पर प्रशासकीय सहाय्याच्या बहुपक्षीय अधिवेशनावर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार, 2018 नंतर वार्षिक खात्यामधील सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांत ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉरमेशन (Automatic exchange of information) (एईओआय) कार्यान्वित करण्यात आले आहे, असे अर्थमंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात जाहीर केले आहे.

भारत (India) आणि स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) 2012 आणि 2020 मध्ये नागरिकांच्या आर्थिक माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. वित्तीय खात्यांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सध्या असणारी कायदेशीर प्रणाली पाहता भारतीय रहिवाशांच्या अघोषित उत्पन्नांपेक्षा स्विस बॅंकामध्ये ठेवी वाढवण्याची कोणतीही संभाव्य शक्यता दिसत नाही, असे अर्थ मंत्रालयाने नमूद केले आहे.

स्विस बॅंकेच्या माहितीनुसार, याआगोदर 2016 मध्ये भारतीय ठेवींनी 6.5 अब्ज स्विस फ्रॅंकची विक्रमी नोंद गाठली होती. मात्र त्यानंतर 2011, 2013 तसेच 2017 वगळता स्विस बॅंकेमध्ये भारतीयांनी पैसे जमा करण्यामध्ये फारसा रस दाखविला नव्हता. परंतु 2020 ने जमा करण्यात आलेल्या रकमेचे सगळे आकडे मोडले. 2020 मध्ये ज्या ठिकाणी खासगी ग्राहकांच्या खात्यामध्ये भारतीय ठेवींमध्ये जवळपास 4000 कोटी रुपये होते. तर इतर बॅंकामार्फत 3100 कोटी रुपये जमा झाले. त्याचबरोबर सर्वाधिक 13,500 कोटी रुपये बॉंड, सुरक्षा ठेव आणि इतर माध्यमांद्वारे गुंतवण्यात आले आहेत. ही सादर करण्यात आलेली आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या  आकडेवारीचा संबंध नसल्याचेही स्विस बॅंकद्वारे स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT