Indian Railways Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल; यूजर्स म्हणाले...

Indian Railways: ही व्हिडिओ क्लिप लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकाची असल्याचे सांगण्यात येत आहे. असे दिसून येते की ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे.

Manish Jadhav

Indian Railways Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. ही व्हिडिओ क्लिप लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकाची असल्याचे सांगण्यात येत आहे. असे दिसून येते की ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे, तरीही लोक त्यात चढण्यासाठी धडपडत आहेत.

या स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांनाही उतरण्यासाठी मोठी धडपड करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. अनेक प्रवासी सामानासह ट्रेनमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, ही व्हिडिओ क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की हे प्रकरण भारतीय रेल्वेपर्यंत (Indian Railways) पोहोचले. याबाबत निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती भारतीय रेल्वेने एका पोस्टद्वारे दिली आहे. ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे की लोकांना टॉयलेटमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतोय आणि अनेकांना त्यात जागाही मिळत नाही. त्याचवेळी, अनेक प्रवासी असे होते ज्यांनी ट्रेनमधील गर्दी पाहून पुढची ट्रेन येण्याची वाट पाहणे चांगले मानले. अनेक जण रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये थांबून पुढच्या ट्रेनची वाट पाहत होते.

व्हायरल व्हिडीओबाबत रेल्वेचे म्हणणे काय?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपडणाऱ्या प्रवाशांचा (Passengers) आवाजही ऐकू येतो. एक प्रवासी म्हणतो, 'बाथरुममध्ये जावा...' प्रवासी चिंतेत दिसत आहेत आणि त्यांना काय करावे ते समजत नाही. काही लोक ट्रेनच्या टॉयलेटमध्ये उभे राहून बाहेर प्रवाशांमध्ये सुरु असलेली हाणामारी पाहत असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

सोशल मीडिया यूजर्संनी या परिस्थितीबद्दल संताप व्यक्त केला आहे आणि अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे. प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे सेवा नावाचे अधिकृत X अकाऊंट आहे. या व्हायरल क्लिपवर रेल्वे सेवेने प्रतिक्रिया देत म्हटले की, 'हे प्रकरण संबंधित अधिकारी डीआरएम लखनऊ यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT