Viral Video: "आम्ही तुम्हाला आमचे तुकडे पाडू देणार नाही," ब्रिटीश संसदेत कडाडली काश्मीरी कन्या

Yana Mir: "मी तुम्हाला धर्माच्या आधारावर भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवण्याची विनंती करते. आम्ही तुम्हाला आमचे तुकडे करू देणार नाही."
Yana Mir
Yana MirX, @YanaMir
Published on
Updated on

We will not let you tear us to pieces," a Kashmiri girl Yana Mir snarled in the British Parliament:

काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिमा खराब करण्याच्या पाकिस्तानच्या प्रचार यंत्रणेचा तीव्र निषेध केला आणि त्या म्हणाल्या की, "भारताचा एक भाग असलेल्या काश्मीरमध्ये त्या पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत."

लंडनमध्ये यूके संसदेने आयोजित केलेल्या 'संकल्प दिवस' मधील भाषणात त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यम समुदायाला जम्मू आणि काश्मीरमधील लोकांमध्ये फूट पाडणे थांबवण्याचे आवाहन केले.

यावेळी याना मीर यांनी असेही सांगितले की "मी मलाला युसुफझाई नाही," जिला दहशतवादाच्या गंभीर धोक्यांमुळे आपल्या देशातून पळून जावे लागले होते. मात्र, माझा देश दहशतवादाच्याविरूद्ध नेहमीच मजबूत आणि एकजूट राहील.

"मी मलाला युसुफझाई नाही, कारण मी माझ्या देशात, भारतामध्ये स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. माझ्या जन्मभूमीत, काश्मीरमध्ये, जो भारताचा भाग आहे. मला कधीही पळून जाऊन तुमच्या देशात आश्रय घेण्याची गरज भासणार नाही. मी कधीही मलाला युसुफझाई होणार नाही.

मीर पुढे म्हणाल्या, "मलाला युसुफझाईने पण माझ्या देशाला, माझ्या पुरोगामी मातृभूमीला अत्याचारित म्हणवून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियातील अशा सर्व टूलकिट सदस्यांवर माझा आक्षेप आहे, ज्यांनी कधीही भारतीय काश्मीरला भेट देण्याची पर्वा केली नाही पण तेथे होत नसलेल्या अत्याचाराच्या कथा रचल्या."

Yana Mir
Viral Video: सलाम! भारतीय लष्कराचे कौतुकास्पद काम, 500 पर्यटकांची केली मृत्यूच्या दारातून सुटका

आपल्या भाषणात मीर यांनी आंतरराष्ट्री मीडियाल आवाहन करताना म्हटले की, "मी तुम्हाला धर्माच्या आधारावर भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवण्याची विनंती करते. आम्ही तुम्हाला आमचे तुकडे करू देणार नाही. या वर्षी संकल्प दिनानिमित्त मला आशा आहे की ब्रिटन आणि पाकिस्तानमध्ये राहणारे आमचे गुन्हेगार माझ्या देशाची बदनामी करणे थांबवतील."

Yana Mir
Viral Video: Byju's च्या कार्यालयात बाप लेकाचा धिंगाना, फी परत दिली नाही म्हणून टीव्ही नेला काढून

या कार्यक्रमादरम्यान, याना मीर यांना जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील विविधतेला चालना देण्यासाठी डायव्हर्सिटी ॲम्बेसेडर पुरस्कारही मिळाला.

शिवाय, मीर यांनी सुधारित सुरक्षा, सरकारी उपक्रम आणि निधी वाटप यावर भर देत, कलम 370 रद्द केल्यानंतरच्या प्रगतीची रूपरेषा सांगितली.

यावेळी याना मीर यांनी भारतीय लष्कराच्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली, ज्यात कट्टरतावाद संपवण्याचे कार्यक्रम आणि युवकांमध्ये खेळ आणि शिक्षणासाठी भरीव गुंतवणूक यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com