Indian Army Women Officers Dainik Gomantak
देश

Indian Army Women Officers: LAC-LOC वर शत्रूंना भरणार आता धडकी, 'या' रेजिमेंटला मिळाल्या 5 महिला अधिकारी!

Artillery Regiment Indian Army: भारतीय लष्कराने पहिल्यांदाच आपल्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.

Manish Jadhav

Artillery Regiment Indian Army: भारतीय लष्कराने पहिल्यांदाच आपल्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.

यापैकी तिघींची पोस्टिंग चीनच्या सीमेला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात करण्यात आलेल्या पथकांकडे गेली आहे.

लेफ्टनंट मेहक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट अदिती यादव आणि लेफ्टनंट पायस मुदगील आणि लेफ्टनंट आकांक्षा यांचा आर्टिलरी रेजिमेंटमध्ये समावेश करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA), चेन्नई (Chennai) येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन चीनच्या (China) सीमेला लागून असलेल्या LAC ची जबाबदारी सांभाळणार्‍या युनिटमध्ये तैनात आहेत, तर उर्वरित दोन अधिकार्‍यांना पाकिस्तानच्या सीमेवर अवघड ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

लष्कराची आर्टिलरी रेजिमेंट ही एक महत्त्वाची लढाऊ शाखा आहे, ज्यामध्ये बोफोर्स हॉवित्झर, धनुष, एम-777 हॉवित्झर आणि के-9 वज्र हॉवित्झर यासह विविध प्रकारच्या तोफा चालवणाऱ्या 280 तुकड्यांचा समावेश आहे.

आर्टिलरी रेजिमेंट मध्ये पोस्ट

सूत्रांनी सांगितले की, या तरुण महिला अधिकाऱ्यांना सर्व महत्त्वाच्या आर्टिलरी युनिट्समध्ये नियुक्त केले जात आहे, जेणेकरुन त्यांना कठीण परिस्थितीत रॉकेट, फील्ड अॅण्ड सर्विलान्स अॅण्ड टारगेट ऐक्वजिशन करण्याचे प्रशिक्षण मिळू शकेल.

त्यांनी सांगितले की, लेफ्टनंट सैनी यांना SATA रेजिमेंटमध्ये, लेफ्टनंट दुबे आणि लेफ्टनंट यादव यांना फील्ड रेजिमेंटमध्ये, लेफ्टनंट मुदगील यांची मीडियम रेजिमेंटमध्ये आणि लेफ्टनंट आकांक्षा यांची रॉकेट रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

एका सूत्राने सांगितले की, आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांची तैनाती हा लष्करात होत असलेल्या बदलांचा पुरावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT