Yasin Malik And his wife Mushar Malik. Dainil Gomantak.
देश

Yasin Malik: “…तर माझ्या नवऱ्याला भारत मारून टाकेल”; दहशतवादी यासिन मलिकच्या पत्नीने पुन्हा ओकले विष!

Wife Of Yasin Malik: दहशतवादी आणि फुटीरतावादी यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिने पुन्हा एकदा भारताविरोधात विष ओकले आहे. तिचा पती यासिन मलिक याची भारतात न्यायालयीन हत्या होऊ शकते असा आरोप तिने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशाल भारतावर संतापली आहे. तिने पाकिस्तानकडे पतीला वाचवण्याची विनंती केली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आपल्या पतीला फाशी होऊ शकते, असा दावा मुशाल मलिकने केला आहे.

यासिन मलिकच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आवाज उठवण्याची मागणी त्यांनी पाकिस्तानकडे केली आहे. यासिन मलिक हा पाकिस्तानचा जुना मोहरा आहे. तो आधी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये सामील होता आणि नंतर आत्मसमर्पण करून फुटीरतावादी गट हुर्रियत कॉन्फरन्समध्ये सामील झाला.

यासीन मलिकची पत्नी मुशाल मलिकने पाकिस्तानला सांगितले आहे की, भारतात आपल्या पतीची न्यायालयीन हत्या केली जाऊ शकते. मुशाल पाकिस्तानमधील पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशनची (पीसीओ) अध्यक्ष आहे.

लाहोरमधील जिना हाऊसमध्ये माध्यमांना संबोधित करताना ती म्हणाली भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) प्रमुख यासिन मलिकला पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर २९ मे रोजी (सोमवार) सुनावणी होणार आहे.

यासिनला टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा  

गेल्या वर्षी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने यासिन मलिक विरोधात NIA ची फाशीची याचिका फेटाळली होती. मात्र, न्यायालयाने यासीनला देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासह दोन प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर पाच प्रकरणांत त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

यासिन मलिकच्या जेकेएलएफवर केंद्र सरकारने २०१९ मध्ये बंदी घातली होती. सध्या तो दिल्लीतील तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याशिवाय 1990 मध्ये हवाई दलाच्या 4 जवानांच्या हत्येचाही यासिन मलिक दोषी आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचेही त्याने अपहरण केले.

यासीनची पत्नी मुशाल म्हणाली, तिच्या पतीला  सोमवारी फाशी दिली जाऊ शकते. ती हसत हसत म्हणाली की, मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायचे आहे की, कोणताही काश्मिरी मृत्यूला घाबरत नाही. यासीन मलिक ही व्यक्ती नसून ते एका चळवळीचे नाव आहे, ती म्हणाली. . पतीला फाशी देऊन पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकू शकणार नाहीत, असेही तिने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT