Guwahati Accident: गुवाहाटीमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात, इंजिनीअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Engineering students: अपघातात ठार झालेले सर्वजण अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून ते भाड्याने कार घेऊन फिरायला गेले होते.
Seven Students dies in Car Accident.
Seven Students dies in Car Accident.Dainik Gomantak.
Published on
Updated on

Seven Students Dies in Road Accident

आसाममधील गुवाहाटी येथे रविवारी रात्री उशिरा आसाम अभियांत्रिकी महाविद्यालय (AEC), गुवाहाटी येथील किमान सात विद्यार्थी एका वेदनादायक रस्ते अपघातात ठार झाले. हे दहा विद्यार्थी भाड्याने घेतलेल्या कारमध्ये खानापारा कडे जात असताना हा भीषण अपघात झाला.

कौशिक बरुआ नावाचा विद्यार्थी भरधाव वेगाने कार चालवत असताना अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. यानंतर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या दुसऱ्या पिकअप व्हॅनला धडकली.

सात जणांचा जागीच मृत्यू झाला

समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की कारमधील 10 जणांपैकी सात जण जागीच ठार झाले, तर अन्य तीन विद्यार्थी आणि पिकअप व्हॅनमधील तीन जण गंभीर जखमी झाले.

जखमींना तत्काळ गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, गुवाहाटी येथे नेण्यात आले. अमोन बरुआ, कौशिक मोहन, अरिंदम भल्लाल, नियार डेका, उपांगशु सरमा, राजकिरण भुईया आणि कौशिक बरुआ अशी मृतांची नावे आहेत.

Seven Students dies in Car Accident.
Bageshwar Baba’s Viral Video: "गुजरात के पागलो, कैसे हो"?; धीरेंद्र शास्त्रींचा व्हिडिओ व्हायरल

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “जलुकबारी येथे झालेल्या अपघातात तरुणांचा मृत्यू झाल्याने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पालकांना आणि कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. जीएमसीएचमधील अधिकाऱ्यांशी बोललो. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. असे सरमा म्हणाले.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com