Space Dainik Gomantak
देश

भारत 2023 मध्ये राबणार पहिली मानवी अंतराळ अन् महासागर मोहीम

2023 साली मानवी अंतराळ मोहीम आणि मानवी सागरी मोहीम एकाच वर्षी राबवत भारत विज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप घेणार आहे.

दैनिक गोमन्तक

सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग (Jitendra Singh) यांनी बुधवारी सांगितले की, 2023 मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम "गगनयान" आणि खोल महासागरात (Sea) संशोधन करण्यासाठी सागरी मोहीम राबवली जाणार आहे. 2023 साली मानवी अंतराळ मोहीम आणि मानवी सागरी मोहीम एकाच वर्षी राबवत भारत विज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप घेणार आहे. (India to launch first manned space and ocean mission in 2023)

दिल्लीतील जागतिक महासागर दिनाच्या समारंभाला संबोधित करताना, जितेंद्र सिंग म्हणाले की, अंतराळ आणि महासागर मोहिमेतील दोन्ही चाचण्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत आणि बहुधा 2023 पर्यंत साध्य होतील. सबमर्सिबल 2023 ला होणे अपेक्षित आहे, त्यानंतर MATSYA 6000, खोल पाण्यात चालणारी पाणबुडी 2024 मध्ये चाचणीसाठी तयार होणार आहे."

मिशन गगनयानसाठी क्रू एस्केप सिस्टम कार्यप्रदर्शनाच्या प्रमाणीकरणासाठी चाचणी वाहन उड्डाण यांसारख्या प्रमुख मोहिमा आणि गगनयानचे पहिले अनक्रूड मिशन 2022 च्या उत्तरार्धात नियोजित केले आहे आणि त्यानंतर 2022 च्या शेवटी दुसरे अनक्रूड मिशन होणार आहे.

इस्रोने विकसित केलेला "व्योमित्र" हा स्पेसफेअरिंग मानवी रोबोट, 2023 मधील पहिली क्रू गगनयान मोहीम होणार आहे. तसेच पुढे सिंग म्हणाले की, केंद्र सरकार लवकरच 'ब्लू इकॉनॉमिक पॉलिसी' चे अनावरण करेल आणि 2030 पर्यंत 40 लाख लोकांना महासागर आधारित उद्योगांमध्ये रोजगार मिळेल, असे मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने (Central Government) गेल्या वर्षी जूनमध्ये खोल महासागर मिशनला मंजूरी दिली होती आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पाच वर्षांसाठी 4077 कोटी रुपयांच्या एकूण बजेटमध्येच राबवली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि उद्योगांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

1000 ते 5500 मीटर खोलीवर असलेल्या पॉलीमेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, गॅस हायड्रेट्स, हायड्रो-थर्मल सल्फाइड्स आणि कोबाल्ट क्रस्ट्स सारख्या संसाधनांचा खोल समुद्रामध्ये शोध घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT