देशात कोरोनाचा फैलाव वाढला; गोव्यातही 376 सक्रिय रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या 3,641 ने वाढली आहे.
Goa Covid News Updates
Goa Covid News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : 1 मार्चपासून भारतात दैनंदिन कोरोनाव्हायरस संसर्गाच्या संख्येने प्रथमच 7,000 चा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात भारतात 7,240 नवीन कोविड -19 रुग्ण आढळेल आहेत. दरम्यान, गोव्यात काल कोरोनाचे नवे तब्बल 77 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 8.02 टक्के इतका झाला आहे. (Goa Covid News Updates)

Goa Covid News Updates
गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

गुरुवारी देशात नोंदवलेल्या कोविड प्रकरणांची संख्या बुधवारच्या 5,233 च्या तुलनेत 38 टक्क्यांनी जास्त होती. जून महिन्यात, भारतात आतापर्यंत 39,400 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या 3,641 ने वाढली आहे. सक्रिय रुग्ण आता 32,498 आहेत. मागील 24 तासांत आठ मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 5,24,723 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 3,500 हून अधिक लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्रात मागील 24 तासांत 2,701 नवीन कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहे. मुंबईत 1,765 प्रकरणे आहेत.

Goa Covid News Updates
विषाणू ‘म्युटेड’ होऊ शकतो, लस घेणं हाच पर्याय

गोव्यात कोरोनाचा फैलाव

गोव्यात सक्रिय रुग्णांची संख्या 376 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 192नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 984 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.29 टक्के इतके आहे. काल दिवसभर 960 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com