Rafale Marine google image
देश

Rafale M Aircraft: भारत फ्रान्सकडून घेणार राफेल मरीन फायटर जेट; वैमानिकांना गोव्यात देणार प्रशिक्षण

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात करार होण्याची शक्यता, जाणून घ्या विमानाची खासियत...

Akshay Nirmale

Rafale M Aircraft: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा चांगलाच गाजला. आता पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा एका कारणासाठी महत्वाचा असणार आहे. ते कारण म्हणजे या दौऱ्यात मोदी फ्रान्ससोबत एक महत्वाचा करार करू शकतात.

यापुर्वीच भारताने फ्रान्सकडून राफेल हे अद्ययावत फायटर जेट घेतले आहे. आता या राफेलचीच सागरी आवृत्ती असलेल्या Rafale M (राफेल मरीन) या फायटर जेटसाठीही दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो.

दरम्यान, ही विमाने चालविण्यासाठी भारतीय नौदलाच्या वैमानिकांना फ्रान्समध्ये तसेच गोव्यातील अत्याधुनिक सिम्युलेटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पंतप्रधान मोदी या आठवड्यात दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत राफेल-एम बाबतच्या करारावर स्वाक्षरी करू शकतात. हे फायटर जेट आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर तैनात केले जाईल. ते मिग-29 या फायटर जेटची जागा घेईल.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी 26 राफेल सागरी लढाऊ विमाने (राफेल एम) खरेदी करण्यासाठी अब्जावधी डॉलरच्या कराराची घोषणा करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅकॅॉन हे या करारावर स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती आहे.

याशिवाय 'मेक इन इंडिया' अंतर्गत मुंबईतील माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेडमध्ये तीन स्कॉर्पियन (कलवरी) श्रेणीच्या पाणबुड्या तयार करण्याचा करारही केला जाऊ शकतो.

ही सर्व 26 राफेल-एम विमाने सिंगल सीटर असतील आणि त्यावर भारतीय नौदलाच्या वैमानिकांना फ्रान्समध्ये तसेच गोव्यातील अत्याधुनिक सिम्युलेटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भारतीय नौदल जुन्या मिग 29Ks नंतर INS विक्रांतसाठी नवीन लढाऊ विमान तैनात करण्याचा विचार करत आहे. या बदलासाठी, अमेरिकेच्या F-18 सुपर हॉर्नेट व्यतिरिक्त, राफेल मरीनचाही नौदल विचार करत आहे.

राफेल-एम आवश्यकतेनुसार प्रशिक्षण, दुरुस्ती, देखभाल आणि अपग्रेडबाबत लाभदायी ठरणार आहे. या विमानाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते विमानवाहू जहाजावरून चालवता येईल.

राफेल एमला चांगले रेटिंग मिळाले आहे आणि राफेलबाबत याआधीच आशा निर्माण झाली आहे. राफेल एम चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्याच्या स्टिल्थ क्षमतेमुळे अणुहल्ला देखील करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT