Mapusa Police: अल्पवयीन मुलीचे म्हापशातून अपहरण? मित्रही दोन दिवसापासून गायब; पोलिस तपासात समोर आले वेगळेच सत्य...

म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल
Mapusa Police | Teen Girl Abduction
Mapusa Police | Teen Girl Abduction Google Image
Published on
Updated on

Mapusa Police on Teen girl abduction: एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत दाखल झाली आहे. दरम्यान, पोलिस तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एकतर संबंधित मुलीचा मित्र देखील गायब असून तोही दोन दिवसांपासून घरी पतरलेला नाही. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तर मुलीच्या घरी मुलीचे वडील दररोज दारू पिऊन यायचे आणि घरात दररोज धिंगाणा व्हायचा. त्याला कंटाळून मुलगी घर सोडून निघून गेल्याचे बोलले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Mapusa Police | Teen Girl Abduction
Disaster Relief Fund: केंद्राकडून 22 राज्यांना 7,352 कोटी रुपये आपत्ती निवारण निधी; गोव्याला मिळणार 'इतके' कोटी

संबंधित वृत्तात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या या मुलीने पूर्वी तिच्या पालकांना ताकीद दिली होती की ती कुटुंबातील भांडण सहन करू शकत नाही. पुन्हा भांडण झाले तर ती घर सोडेल. आणि सोमवारी तीने घर सोडले. ती कॉलेजसाठी निघाली परंतु ती तिच्या कॉलेजला गेलीच नाही.

ती नेहमीच्या वेळी घरी न परतल्याने पालकांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी म्हापसा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीत अज्ञातांनी म्हापसा बस स्टँडवरून मुलीचे अपहरण केल्याचे म्हटले आहे.

पोलिसांना त्या मुलीचा एक मित्र असल्याचे लक्षात आले. ती त्याच्यासोबत पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण संबंधित मुलगा देखील दोन दिवसांपासून घरी परतलेला नाही. मुलगी मोबाईल फोन वापरत नाही तर तिच्या मित्राने फोन बंद केला आहे.

Mapusa Police | Teen Girl Abduction
South Goa: खाण, पाणवठे येथे जाणे, पोहणे टाळा; साऊथ गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

दरम्यान, मुलीचे वडील मद्यधुंद अवस्थेत घरी यायचे आणि किरकोळ कारणावरून घरात वारंवार वाद व्हायचे. या प्रकाराला मुलगी कंटाळली होती. त्यामुळे तिने घर सोडले असावे. ती अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपुर्वीच गृहपाठ न केल्याने एक मुलगी शाळेतच गेली नव्हती. त्यामुळे पोलिसांत मुलगी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलगी म्हापसा मार्केटमध्ये फिरत राहिली आणि शाळा सुटताना शाळेत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पण तोपर्यंत पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत शोध घेतला होता. तर आणखी एका प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने वडिलांची बाईक फिरवायला नेली आणि तो मित्रांसोबत मजा करत राहिला. मुले घरी न परतल्याने पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तथापि, नंतर मुले परतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com