Petrol Dainik Gomantak
देश

Petrol Price: महाग पेट्रोलच्या बाबतीत भारत जगात 42 व्या क्रमांकावर

भारतातील महागाई (Inflation) दर महिन्याला वाढत आहे. देशात पेट्रोलचे दरही याआधी दिवसेंदिवस वाढत होते, मात्र सध्या ते एका महिन्याहून अधिक काळ स्थिर आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील महागाई दर महिन्याला वाढत आहे. देशात पेट्रोलचे दरही याआधी दिवसेंदिवस वाढत होते, मात्र सध्या ते एका महिन्याहून अधिक काळ स्थिर आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, भारतातच पेट्रोल सर्वात महाग नाही, या बाबतीत देशाचा क्रमांक 42 वा आहे. म्हणजेच जगातील 41 देशांमध्ये भारतातून सर्वात महागडे पेट्रोल विकले जात आहे. या देशांमध्ये ब्रिटन, जर्मनी, हाँगकाँग, इटली, नेदरलँडसह इतर अनेक देशांचा समावेश आहे. त्याचबरोबर शेजारील देशांमध्येही पेट्रोल महागले आहे.

भारतात पेट्रोलच्या दरांवरुन गदारोळ

सर्वप्रथम भारतातील पेट्रोलच्या (Petrol) किमतींबद्दल बोलूया. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात देशात पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत होती, त्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी देशात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. भारतात (India) इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि राज्यांमध्ये त्यांचे कर कमी करण्यावरुन वाद सुरु झाला आहे. विशेष म्हणजे, इंधनाच्या किमतीतील वाढ ही प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या (पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी कच्चा माल) जागतिक किमतीत वाढ झाल्यामुळे आहे. याशिवाय डॉलरची किंमत वाढल्यामुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. जी सध्याची परिस्थिती आहे.

106 देशांमधून गोळा केलेला डेटा

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) इकॉनॉमिक रिसर्चच्या अहवालात 9 मे 2022 पर्यंत दरडोई उत्पन्नासह विविध देशांमध्ये पेट्रोलच्या किमतींचा अंदाज लावला असून त्याचा तपशीलवार अहवाल सादर करण्यात आला आहे. यात जगभरातील 106 देशांचा समावेश आहे. भारतात पेट्रोलची किंमत US$1.35 प्रति लीटर आहे, ज्यामुळे भारत जगातील देशांमध्ये 42 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच जगातील 41 देश असे आहेत, जिथे पेट्रोलची किंमत भारतापेक्षा जास्त आहे. हा अहवाल नक्कीच थोडा दिलासा देण्यास पात्र आहे. ज्या देशांमध्ये पेट्रोलचे दर भारतापेक्षा जास्त आहेत ते यूके, हाँगकाँग (Hong Kong), फिनलंड, जर्मनी, इटली, नेदरलँड, ग्रीस, फ्रान्स, पोर्तुगाल आणि नॉर्वे आहेत. जिथे पेट्रोल प्रतिलिटर 2 डॉलरच्या वर आहे.

या देशांमध्ये भारतापेक्षा पेट्रोल महागले

भारतातील महाग पेट्रोलच्या बाबतीत, तर हाँगकाँगमध्ये पेट्रोल प्रति लिटर 2.58 डॉलर, जर्मनीमध्ये 2.29 डॉलर प्रति लिटर, इटलीमध्ये 2.28 डॉलर प्रति लिटर, फ्रान्समध्ये 2.07 डॉलर प्रति लिटर, इस्रायलमध्ये 1.96 डॉलर प्रति लिटर, ब्रिटनमध्ये 1.87 डॉलर प्रति लिटर आहे. सिंगापूरमध्ये लीटर 1.87 डॉलर प्रति लिटर, न्यूझीलंडमध्ये 1.75 डॉलर प्रति लिटर आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1.36 डॉलर प्रति लीटर विकले जात आहे. या आर्थिक संपन्न देशांशिवाय फिनलँड, पोर्तुगाल, नॉर्वे असे अनेक देश या यादीत आहेत, जिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 2 डॉलरच्या आसपास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT