Petrol Diesel Price: आजपासून पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 35 पैशांनी होणार महाग

अवघ्या 7 दिवसात 6 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ
Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate TodayDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या 6 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 वेळा वाढ झाली असून 28 मार्च रोजी पुन्हा दर वाढणार आहेत. 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रती लिटर किती असणार आहेत? हे जाणून घेऊया. (Petrol and diesel prices were increased by up to 30 paise and 35 paise per litre)

Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate Today
IAF Recruitment : भारतीय हवाई दलात गट C आणि MTS पदांसाठी भरती

सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागणार असून गेल्या 6 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 वेळा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ ही 22 मार्चपासून झाली असून, त्यानंतर एक दिवस वगळता दररोज काही ना काही दरात वाढ होत आहे. 28 मार्चच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागले आहे. (Petrol Diesel Price Today)

दरम्यान पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ झाल्याने राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोलचा दर 99.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 90.77 रुपये प्रति लिटर असेल. तर मुंबईत (Mumbai) पेट्रोल १४३.८६ रुपये तर डिझेल ९८.४६ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 105.18 रुपये, तर डिझेल 95.33 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये आता तुम्हाला पेट्रोलसाठी 108.81 रुपये मोजावे लागतील, तर डिझेलसाठी 93.90 रुपये मोजावे लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com