Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

रशिया-युक्रेन युद्धामुळे 'भारत' चिंतेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जर्मनीला पोहोचले, जिथे त्यांनी भाषण केले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात ते जर्मनीला पोहोचले, जिथे त्यांनी भाषण केले. युक्रेनवर रशियाच्या सुरु असलेल्या हल्ल्यादरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, 'भारत युक्रेन-रशिया (Russia) युद्धाबाबत चिंतेत असून शांततेच्या बाजूने आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'युध्दादरम्यान स्थिती सामान्य करण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे. भारत आणि जर्मनीचं एक अतूट नातं राहीलं आहे. आम्ही तिसऱ्या देशात सामायिक प्रकल्पांवर काम करत आहोत.' जर्मनीनंतर मोदी डेन्मार्क (Denmark) आणि फ्रान्सला भेट देणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण विस्ताराचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा केली. तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी जर्मनीला पोहोचले. या दौऱ्यात मोदी डेन्मार्क आणि फ्रान्सलाही भेट देणार आहेत.

तसेच, पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर होत आहे, ज्यावर जवळपास संपूर्ण युरोप रशियाच्या विरोधात एकवटला आहे. बर्लिनला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी चांसलर कार्यालयाच्या (Chancery) प्रांगणात पारंपारिक गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी पंतप्रधान मोदींचे जर्मनीत स्वागत केले. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी दोन्ही नेत्यांनी चहापानावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील 6 व्या भारत-जर्मनी आंतरसरकारी सल्लामसलत (IGC) कार्यक्रमापूर्वी ही चर्चा झाली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत सांगितले की, “भारत-जर्मनी सहकार्याचा विस्तार पंतप्रधान मोदींच्या या भेटीतून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची बर्लिनमध्ये भेट झाली. डिसेंबर 2021 मध्ये पदभार स्वीकारणाऱ्या जर्मन चांसलर स्कोल्झ यांच्याशी पंतप्रधान मोदींची ही पहिलीच भेट आहे.''

विशेष म्हणजे, रशियावर निर्बंध लादण्याच्या ठरावावरील मतदानादरम्यान एप्रिलमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत अनुपस्थित राहिलेल्या 50 देशांमध्ये भारताचा समावेश होता.

दुसर्‍या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदी आणि चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यात बर्लिनमध्ये चर्चा सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी व्यापार, सांस्कृतिक संपर्क इत्यादींसह भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण आढावा घेतला.'' दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करणे अपेक्षित आहे.

यापूर्वी, दोन्ही नेते गेल्या वर्षी G20 च्या बैठकीत भेटले होते, जेव्हा शॉल्ज वाइस चांसलर आणि अर्थमंत्री होते. डिसेंबर 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची ही पहिलीच बैठक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parra Road: 'हे झाड कधीही कोसळेल!' 2.5 वर्षांपासून दुर्लक्ष; साळगाव सरपंचांचा वन विभागाला 'अल्टिमेटम'

Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

KBC Viral Video: "मला नियम सांगू नका", करोडपतीच्या सेटवर बिग-बींना उलटउत्तर; 10 वर्षांच्या स्पर्धकावर नेटकऱ्यांची टीका

Goa News: 'हो' प्रस्न सोडयात! कामगार आक्रमक; शिरगावच्या बांदेकर खाणीवरील कामकाज रोखले Video

Kuldeep Yadav: टीम इंडियाचा नवा विकेट किंग! कुलदीप बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा 'नंबर 1' गोलंदाज VIDEO

SCROLL FOR NEXT