Russia Ukraine War
Russia Ukraine War Dainik Gomantak

आम्ही युक्रेनला आत्मसमर्पण करण्यास सांगत नाही, मात्र...: रशियाचे परराष्ट्र मंत्री

युक्रेनमध्ये तुरुंगात असलेल्या सर्व नागरिकांची सुटका करावी, अशी रशियाची मागणी आहे.
Published on

रशिया-युक्रेनमधील युद्ध (War) सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर झुकायला तयार नाहीत. रशिया 9 मे रोजी विजय दिवस साजरा करतो. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईत कोणताही बदल करणार नाही. आमचे सैन्य हल्ला करत राहील, असा इशारा रशियाचे (Russia) परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी दिला आहे.

Russia Ukraine War
अमेरिकेतील शिकागोमध्ये गोळीबार; 8 जणांनी गमावला जीव

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, आम्हाला देशात उत्सवाचे वातावरण हवे आहे. आम्हाला कोणतीही अनुचित घटना नको आहे, म्हणून आम्ही या दिवशी युक्रेनमध्ये आमची लष्करी कारवाई आणखी तीव्र करू. आपले सैनिक पाश्चिमात्य देशांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत.

आम्ही झेलेन्स्कीला आत्मसमर्पण करण्यास सांगत नाही: लावरोव्ह
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आत्मसमर्पण करावे अशी रशियाची इच्छा आहे का, असा प्रश्न लॅव्हरोव्ह यांना पत्रकारांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना लावरोव्ह म्हणाले की, मॉस्को आत्मसमर्पण करा असे म्हणत नाही, मात्र पूर्व युक्रेनमध्ये तुरुंगात असलेल्या सर्व नागरिकांची सुटका करावी आणि प्रतिकार थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी आमची मागणी आहे.

लॅव्हरोव्ह यांनी जोर दिला की रशिया पूर्व युक्रेनमधील सर्व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून त्यांना या देशाच्या लष्करीकरण किंवा नाझीवादाचा धोका होणार नाही आणि युक्रेनच्या भूभागाला रशियन फेडरेशनच्या सुरक्षेला कोणताही धोका होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com